भारत 'ए' संघाला झटका, मुंबईकर खेळाडू संघातून बाहेर

भारत 'ए' संघाला झटका, मुंबईकर खेळाडू संघातून बाहेर

भारतीय खेळाडूंच्या दुखापतींची मालिका सुरूच आहे. युवा फलंदाज पृथ्वी शॉला दुखापतीमुळे वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 04 जुलै : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला दुखापत झाली असून तो 11 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. पृथ्वी शॉ इंडिया ए संघातून बाहेर पडला आहे. त्याला नेमकी काय दुखापत झाली हे समजू शकले नाही. त्याच्यावर बेंगळुरूतील नॅशनल क्रिकेक अकॅडमीत उपचार घेत आहे. पृथ्वी शॉच्या जागी महाराष्ट्राचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला संघात स्थान दिलं आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध देशांतर्गत सामन्यात भारत ए कडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्यानं 5 सामन्यात 4 डावांमध्ये 470 धावा केल्या होत्या. यात त्याच्या नाबाद 187 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारत ए संघातून मयंक अग्रवाल आणि ऋषभ पंत आधीच बाहेर पडले आहेत. दोघांनाही वर्ल्ड कप संघात संधी मिळाल्यानं वेस्ट इंडीज दौऱ्यातून बाहेर व्हावं लागलं. पंतला शिखर धवनच्या जागी तर मयंक अग्रवालला विजय शंकरच्या जागी घेण्यात आलं आहे. त्यामुळं पंत आणि मयंकच्या जागी भारत ए मध्ये अनमोलप्रीत सिंह आणि ईशान किशनला संधी मिळाली आहे. इंडिया ए संघाची वेस्ट इंडीजमध्ये 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

अनमोलप्रीत आणि ईशान किशन गेल्या वर्षभरापासून इंडिया ए मध्ये होते. दोघांनी लंकेविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. ऋषभ पंत आणि ईशान किशन एकत्र अंडर 19 वर्ल्ड कप खेळले आहेत. त्या संघाचा कर्णधार ईशान किशन होता.

इंडिया ए संघ : मनीष पांडे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, अनमोलप्रीत सिंह, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ईशान किशन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, क्रुणाल पंड्या दीपक चाहर, खलील अहमद, आवेश खान आणि नवदीप सैनी

World Cup : सेमीफायनलसाठी पाकिस्तानची धडपड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

World Cup : सेमीफायनलमध्ये भारत पुन्हा भगव्या जर्सीत खेळणार?

SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

First published: July 4, 2019, 9:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading