मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /खराब फॉर्ममध्ये राहुल द्रविडचा 'हा' सल्ला कामी आला, पृथ्वी शॉचा खुलासा

खराब फॉर्ममध्ये राहुल द्रविडचा 'हा' सल्ला कामी आला, पृथ्वी शॉचा खुलासा

टीम इंडियाचा युवा बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचा मागील आयपीएलमध्ये (IPL 2020) खराब फॉर्ममध्ये होता. या खराब फॉर्ममध्ये राहुल द्रविडचा (Rahul Dravid) सल्ला कामी आला, असा खुलासा पृथ्वीने केला आहे.

मुंबई, 27 मे: टीम इंडियाचा युवा बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचा मागील आयपीएलमध्ये (IPL 2020) खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएल नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो फेल गेला. त्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉ ने जोरदार खेळ केला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक रन करण्याचा विक्रम केला. तर आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी त्याने 166.49 च्या स्ट्राईक रेटने 308 रन काढले आहेत. पृथ्वी शॉ याने  या बदललेल्या फॉर्मचं श्रेय टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड (Rahul Dravid) याला दिले आहे.

राहुल द्रविडने 'हे' कधीच  सांगितले नाही

पृथ्वी शॉ याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने अंडर - 19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्या टीमचा राहुल द्रविड कोच होता. 'क्रिकबझ' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीने द्रविडच्या त्या वर्ल्ड कपच्या आठवणी सांगितल्या. 'मी 2008 साली विराट कोहलीच्या टीमने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकताना टीव्हीवर पाहिले होता. त्यावेळी मला ही कोणती स्पर्धा असते हे देखील माहिती नव्हते. मला वडिलांनी या स्पर्धेचे नाव सांगितले. त्यानंतर मला या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. तो खूप आनंदाचा क्षण होता. आम्ही वर्ल्ड कप जिंकला. आमची टीम खूप चांगली होती.' असे पृथ्वीने सांगितले.

'महेंद्रसिंह धोनी स्वत: CSK पासून दूर होणार', 'या' क्रिकेटपटूचा दावा

'राहुल द्रविड सोबत मी अंडर 19 वर्ल्ड कप सह इंडिया A टीममध्ये देखील खेळलो आहे. त्यांनी कधीही आमच्यावर एखादी गोष्ट थोपवण्याची किंवा लादण्याची गोष्ट केली नाही. त्यांनी माझ्या बॅटींगची नैसर्गिक शैली देखील बदलली नाही. मी 'पॉवर प्ले' मध्ये खेळलो तर चांगले रन काढेल, हे त्यांना माहिती होते. त्यांनी मला कधीही मला स्वाभाविक खेळ खेळण्यापासून अडवले नाही.' असे पृथ्वीने सांगितले. ' नैसर्गिक खेळ करण्याचा द्रविडचा सल्ला पृथ्वी शॉ याला खराब फॉर्ममध्ये कामी आला आहे.

पृथ्वीची इंग्लंड दौऱ्यात जाणाऱ्या टीम इंडियात निवड झालेली नाही. श्रीलंकेमध्ये जुलै महिन्यात होणाऱ्या मालिकेसाठी त्याची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Prithvi Shaw, Rahul dravid