Home /News /sport /

Prithvi Shaw Love Story : पृथ्वी शॉ - प्राची सिंहचे ब्रेकअप! दोघांनी उचललं मोठं पाऊल

Prithvi Shaw Love Story : पृथ्वी शॉ - प्राची सिंहचे ब्रेकअप! दोघांनी उचललं मोठं पाऊल

टीम इंडियातील मुंबईकर ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा त्याच्या आक्रमक बॅटींगबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.

    मुंबई, 7 जून : टीम इंडियातील मुंबईकर ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा त्याच्या आक्रमक बॅटींगबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. पृथ्वीचे  अभिनेत्री प्राची सिंहशी (Prachi Singh) नाव जोडण्यात आले आहे. हे दोघं बराच काळापासून एकमेकांना डेट करत होते, अशीही चर्चा होती. या दोघांची सोशल मीडियावरील जवळीक पाहून हा सर्व अंदाज लावण्यात येत होता. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर पृथ्वी सध्या रणजी ट्रॉफीच्या लढतींमध्ये व्यस्त आहे. त्याचवेळी त्याचे आणि प्राचीचे ब्रेकअप (Breakup) झाल्याची चर्चा आहे. पृथ्वी आणि प्राची या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यानंतर त्यांच्यातील ब्रेकअपची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी प्राची पृथ्वीच्या क्रिकेटमधील यशाचा आनंद इन्स्टाग्रामवर साजरा करत असे. हे दोघंही एकमेकांना फॉलो करत तसंच त्यांच्यातील सोशल मीडियावरील केमिस्ट्री ही फॅन्सच्या चर्चेचा विषय होती. कोण आहे प्राची? प्राची सिंह ही नवोदीत अभिनेत्री आहे. तिनं कलर्स टीव्हीवरील उडान या मालिकेत काम केलं आहे. प्राची मॉडल असून उत्तम डान्सर देखील आहे. सोशल मीडियावर प्राची पृथ्वीचे फोटो टाकत असते. 2020च्या आयपीएल स्पर्धेपासून या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होत होती. दोघंही इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. IPL इतिहासातील गाजलेल्या Mystery Girls, ज्यांनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ गेल्या वर्षीच्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेदरम्यान जेव्हा पृथ्वी शॉ चांगलं खेळत होता, तेव्हा प्राची त्याचं कौतुक करणाऱ्या आणि त्याला चिअर करणाऱ्या पोस्ट इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत होती. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वीला रिटेन केल्यानंतरही तिनं पृथ्वीचं सोशल मीडियावरून अभिनंदन केलं होतं.
    First published:

    Tags: Cricket news, Prithvi Shaw, Social media

    पुढील बातम्या