सिडनी, 1 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) जानेवारी 2021 मध्ये आई-वडील होणार आहेत. गर्भवती असताना लॉकडाऊनमध्येही अनुष्का शर्माने स्वत:ला फिट ठेवलं. याचमुळे ती अजूनही आरामात चित्रपटांचं शूटिंगही करत आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्काला शिर्षासन करायला मदत करत आहे.
हे आसन सगळ्यात कठीण असल्याचं अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये म्हणलं आहे. योगा माझ्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. गर्भवती असतानाही आधी जो योगा करत होतीस, तोच योगा कर असं डॉक्टरांनी सांगितल्याचं अनुष्का म्हणाली.
View this post on Instagram
'सक्षम पती विराटनेही योगा करताना मदत केली. योगाच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली हे आसन केलं. गर्भवती असतानाही मला योगा करता आला, याचा आनंद आहे. हा फोटो जुना आहे,' असं अनुष्काने सांगितलं
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे, तर अनुष्का शर्मा मुंबईमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली पहिली टेस्ट खेळून विराट मुंबईला परतणार आहे. बीसीसीआयनेही विराटच्या पितृत्वासाठीच्या रजेला परवानगी दिली आहे. या दौऱ्यातली तिसरी वनडे 2 डिसेंरबरला होईल. वनडे सीरिजमधल्या सुरुवातीच्या दोन मॅचमध्ये आधीच पराभव झाल्यामुळे भारताने सीरिज गमावली आहे. वनडे संपल्यानंतर तीन मॅचच्या टी-20 सीरिजला सुरुवात होईल. यानंतर चार टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.