मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाला दिलासा, इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेले खेळाडू कोरोनामुक्त

टीम इंडियाला दिलासा, इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेले खेळाडू कोरोनामुक्त

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेले प्रसिद्ध कृष्णा (Prasidha Krishana) आणि वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) हे खेळाडू कोरोनामुक्त झाले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 मे: टीम इंडियाच्या (Team India) इंग्लंड दौऱ्याचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. या दौऱ्यापूर्वी टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेले प्रसिद्ध कृष्णा (Prasidha Krishana) आणि वृद्धीमान साहा (Wriddhiman Saha) हे खेळाडू कोरोनामुक्त झाले आहेत. कृष्णाने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे मालिकेत टीम इंडियात पदार्पण केले होते. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली आहे. कृष्णाला 8 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. आयपीएल स्पर्धेहून परतल्यानंतर कृष्णाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर तो बंगळुरुमधील घरीच क्वारंटाईन होता.

इंग्लंड दौऱ्यावर निवड झालेला विकेट किपर - बॅट्समन वृद्धीमान साहा देखील कोरोनामुक्त झाला आहे. साहाला आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. त्याचा दुसरा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचा देखील कोरोना रिपोर्ट आता निगेटीव्ह आला आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणारे टीम इंडियाचे सर्व खेळाडू मुंबईमध्ये क्वारंटाईन होणार आहेत. मात्र साहाला काही दिवस कोलकातामध्ये कुटुंबासोबत राहण्याची बीसीसीआयनं परवानगी दिली आहे.

अमित मिश्रा कोरोनामुक्त

दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्रा (Amit Mishra) देखील कोरोनामुक्त झाला आहे. अमित मिश्राला आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून तो आता बरा झाला आहे. मिश्रानं ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

केएल राहुल  फिट

टीम इंडियाचा बॅट्समन केएल राहुल (KL Rahul) देखील इंग्लंड दौऱ्यासाठी फिट झाला आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) दरम्यान केएल राहुलचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं. यानंतर कोरोनामुळे आयपीएल अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. केएल राहुलची निवड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी (India vs England) झाली होती, पण त्याआधी राहुलला फिट होणं गरजेचं होतं.

भारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड, वेस्ट इंडिजविरुद्ध T20 खेळणार

केएल राहुल रस्त्यामार्गे बंगळुरुहून चेन्नईला जाईल. यानंतर तो मुंबईत विमानाने दाखल होईल. मुंबईमध्ये 24 मे रोजी सगळे खेळाडू बायो-बबलमध्ये दाखल होतील, त्याआधी सगळ्या खेळाडूंच्या दोन-दोन कोरोना टेस्ट होणार आहेत. दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच खेळाडूंना बायो-बबलमध्ये प्रवेश मिळेल.

First published:

Tags: Covid-19, Cricket, India vs england, New zealand, Team india