INDvsWI रोहितसह 'या' खेळाडूंसाठी सराव सामना महत्त्वाचा, पंतसमोर मोठं आव्हान!

विंडीजविरुद्ध शनिवारपासून तीन दिवसीय सराव सामना होणार आहे. पंतला या सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल अन्यथा त्याची सुट्टी होऊ शकते.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 07:33 PM IST

INDvsWI रोहितसह 'या' खेळाडूंसाठी सराव सामना महत्त्वाचा, पंतसमोर मोठं आव्हान!

अँटिगुआ, 17 ऑगस्ट : वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा तीन दिवसीय सराव सामना होणार आहे. या सामन्यात चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराह त्यांच्या कामगिरीचं प्रदर्शन करतील. कर्णधार विराट कोहली सराव सामन्यात विश्रांती घेण्याची शक्यता आहे. विराट कोहली सध्या फॉर्ममध्ये असून त्यानं टी 20 मध्ये 106 धावा आणि वनडेत 234 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे.

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा बेजबाबदारपणा त्याला धोक्याचा ठरू शकतो. ऋद्धिमान साहा संघात परतला असून तो फॉर्ममध्ये आहे. पंतनं जर सराव सामन्यात धावा केल्या नाही तर त्याच्या जागी ऋद्धिमान साहाला संधी मिळण्याची शक्यता आहे. कसोटीमध्ये चेतेश्वर पुजारा सहा महिन्यांनी पुनरागमन करणार आहे. पुजारा याआधी सौराष्ट्रसाठी रणजी ट्रॉफीकडून फायनलमध्ये खेळला होता. तर अजिंक्य रहाणेनं इंग्लिश काउंटीत सात सामन्यात फक्त 307 धावा केल्या. यात एका शतकाचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यामुळं या दोन्ही खेळाडूंसाठी कसोटी मालिका महत्त्वाची असणार आहे.

वर्ल्ड कपपर्यंत सतत खेळत असलेल्या बुमराहला टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर आता तो सराव सामन्यासाठी मैदानात उतरेल. तर वर्ल्ड कपमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्माला टी20 आणि एकदिवसीय सामन्यात मात्र फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तर पंतसाठी सुद्धा सराव सामन्यात कामगिरी उंचावण्याची संधी आहे. त्याचे यष्टीरक्षण कौतुकास्पद असले तरी बेजबाबदार फटकेबाजीमुळं त्याच्या फलंदाजीवर टीका होत आहे. त्यामुळं साहाची दावेदारी पक्की होऊ शकते.

सराव सामन्यात मयंक अग्रवाल सलामीला खेळू शकतो. मात्र त्याच्यासोबत कोण येईल हे निश्चित नाही. हनुमा विहारी आणि लोकेश राहुल यांच्यातील कोणालाही संधी मिळेल. याशिवाय वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि इशांत शर्मासुद्धा संघात परतण्यास उत्सुक आहेत. भारताच्या फिरकीची धुरा आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्यावर असेल.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, ऋद्धिमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, उमेश यादव

Loading...

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 03:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...