मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: जयपूरमध्ये होणारी पहिली T20 मॅच संकटात, दोन्ही टीमसमोर मोठा पेच

IND vs NZ: जयपूरमध्ये होणारी पहिली T20 मॅच संकटात, दोन्ही टीमसमोर मोठा पेच

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी20 सीरिजमधील पहिली मॅच जयपूरमध्ये होणार असून या मॅचपूर्वी दोन्ही टीमसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी20 सीरिजमधील पहिली मॅच जयपूरमध्ये होणार असून या मॅचपूर्वी दोन्ही टीमसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी20 सीरिजमधील पहिली मॅच जयपूरमध्ये होणार असून या मॅचपूर्वी दोन्ही टीमसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) संपताच आता पुढील क्रिकेट सीरिजचे वेध लागले आहेत. राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यापासून ही भारतीय क्रिकेट टीमची पहिली सीरिज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी20 सीरिजमधील पहिली मॅच जयपूरमध्ये होणार असून या मॅचपूर्वी दोन्ही टीमसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दिल्लीतील हवेच्या प्रदुषणाचा परिणाम  जवळपासच्या शहरांवर होत आहे. जयपूरची हवा देखील यामुळे दूषित झाली आहे. तेथील हवेतील प्रदूषण (Air Pollution) वाढले आहे.  जयपूर एयर क्वालिटी इंडेक्सनुसार गेल्या आठवड्यापासून जयपूरमधील हवेत प्रदूषण वाढले आहे. रविवारी जयपूरच्या हवेतील AQI स्तरची 337 इतकी नोंद करण्यात आली आहे. दिवाळीपासून जयपूरमधील ही दुसऱ्या क्रमांकाची खराब नोंद आहे. दिवाळीच्या दिवशी जयपूरमधील AQI 364 इतका होता. 8 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय मॅच भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मॅचच्या निमित्तानं जयपूरमध्ये 8 वर्षाांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच होणार आहे. टीम इंडिया जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पहिल्यांदाच टी20 मॅच खेळणार आहे. यापूर्वी इथं 12 वन-डे आणि 1 टेस्ट मॅच झाली आहे. टीम इंडियानं 12 पैकी 8 वन-डेमध्ये विजय मिळवला आहे. तर इथं झालेली एकमेव टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील पहिली टी20 मॅच जयपूरमध्ये 17 नोव्हेंबरला होणार आहे. दुसरी टी20 19 तारखेला रांचीमध्ये तर तिसरी 21 तारखेला कोलकातामध्ये होईल. 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान पहिली टेस्ट कानपूरमध्ये तर 3 ते 7 डिसेंबर दरम्यान दुसरी टेस्ट मुंबईत खेळली जाणार आहे. IND vs NZ : टेस्ट सीरिजसाठी द्रविड लागला कामाला, जडेजानं घेतला महत्त्वाचा निर्णय टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर.अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया : अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धीमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. टीप: विराट कोहलीला कानपूर टेस्टसाठी विश्रांती देण्यात आली असून तो मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियात सहभागी होईल
First published:

पुढील बातम्या