मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मुंबईकर 'सूर्या' तळपला, 42 बॉलमध्ये काढले 178 रन! दक्षिण आफ्रिकेचे तिकीट निश्चित

मुंबईकर 'सूर्या' तळपला, 42 बॉलमध्ये काढले 178 रन! दक्षिण आफ्रिकेचे तिकीट निश्चित

मुंबईकर सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) 2021 हे वर्ष यशस्वी ठरले. या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात त्याने फक्त 42 बॉलमध्ये 178 रन काढत दक्षिण आफ्रिकेचे (India vs South Africa) तिकीट निश्चित केले आहे.

मुंबई, 25 डिसेंबर : मुंबईकर सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) 2021 हे वर्ष यशस्वी ठरले. त्याला या वर्षी टीम इंडियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) खेळला. त्याचबरोबर इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट टीममध्ये त्याचा निवड झाली होती. आता या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात स्थानिक क्रिकेटमध्ये सूर्यानं 249 रनची आक्रमक खेळी केली. या खेळीनं त्याने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे मालिकेचं तिकीट निश्चित केले आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड अद्याप झालेली नाही.

सूर्यकुमार यादवनं मुंबईत सुरू असलेल्या 74 व्या पोलीस  शिल्ड स्पर्धेत (Police Shield) आक्रमक द्विशतक झळकावले. तीन दिवसाच्या या सामन्यात त्याने पारसी जिमखानाकडून (Parsee Gymkhana) खेळताना स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पहिल्याच दिवशी ही कामगिरी केली. सूर्यानं 152 बॉलमध्ये 249 रन काढले. या खेळीत त्याने 37 फोर आणि 5 सिक्स लगावले. याचाच अर्थ त्याने फक्त 42 बॉलमध्ये 178 रन काढले.

सूर्याच्या या द्विशतकामुळे त्याच्या टीमनं पहिल्या दिवशी 90 ओव्हर्समध्ये 9 आऊट 524 रनचा विशाल स्कोअर केला. आदित्य तरेनं 73, सचिन यादवनं 63 आणि विक्रांतनं 52 रन काढत सूर्याला साथ दिली. तर सिद्धेश लाडनं 40 रन देत 3 विकेट्स घेतल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करते. यामध्ये सर्व मोठे खेळाडू सहभागी होतात.

'ती' गोष्ट नेहमी लक्षात ठेवेन,' हरभजनच्या निवृत्तीनंतर श्रीसंतची पहिली प्रतिक्रिया

सूर्याला यावर्षी टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्याने 3 वन-डे मॅचमध्ये 62 च्या सरासरीनं 124 रन केले आहेत. यामध्ये एक अर्धशतक झळकावले आहेत. तर 9 टी20 इंटरनॅशनलमध्ये त्याने 35 च्या सरासरीनं 244 रन केले असून यामध्ये तीन अर्धशतकाचा समावेश आहे. सूर्याच्या या दमदार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) 8 कोटी रूपयांमध्ये त्याला रिटेन केले आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Mumbai, Suryakumar yadav