मुंबई, 28 जानेवारी : एका राष्ट्रीय क्रिकेटपटूला पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीमध्ये उघड झाला आहे. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यानं क्रिकेटपटूच्या चेहऱ्यावर मारहाण केली. त्यामध्ये त्याचा डोळा थोडक्यात बचावला आहे. विकास टोकस (Vikas Tokas) असं या क्रिकेटपटूंच नाव असून त्यानं या प्रकरणात दिल्ली पोलीस मुख्यालयात तक्रार दाखल केली आहे. विकास यापूर्वी विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमचा सदस्य होता.
दिल्लीतील भिकाजी कामा पोलीस स्टेशनमधील पोस्ट इंचार्जच्या विरूद्ध विकासनं ही तक्रार केली आहे. या अधिकाऱ्यानं आपल्याशी गैरव्यवहार केला. तसेच चेहऱ्याला मारहाण केली. त्यामध्ये आपला डोळा थोड्यात बचावला, असे विकासने या तक्रारीत म्हटंले आहे.

विकासने दिल्ली पोलीस मुख्यालयात याबाबतचा ईमेल केला आहे. '26 जानेवारी 2022 रोजी माझ्याबाबत जे घडलं त्याची तक्रार करण्यासाठी हा ईमेल करत आहे. मी नॅशनल आणि आयपीएल क्रिकेटपटू आहे. त्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यानं माझ्याशी केलेला व्यवहार निंदनीय होता. एका अधिकाऱ्यानं मला बुक्की मारली. माझा डोळा निकामी होण्यापासून थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणाची तुम्ही तातडीने दखल घ्यावी असे तुम्हाला निवेदन करतो. कारण, या घटनेचा मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे,' असे विकासने म्हंटले आहे. तसेच त्याने स्वत:चे फोटो देखील पाठवले आहेत.
पंतप्रधान मोदींचं प्रजासत्ताक दिनी पीटरसनला पत्र, हिंदीमधून आलं मन जिंकणारं उत्तर
विकास देशांतर्गत क्रिकेट दिल्लीमध्ये खेळतो. तो यापूर्वी रेल्वेकडून देखील खेळला आहे. आयपीएल 2016 मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं करारबद्ध केले होते. त्यावेळी विराट आरसीबीचा कॅप्टन होता. पण, त्याला एकाही आयपीएल मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. विकासनं 15 फर्स्ट क्लास आणि 17 टी20 मॅच खेळल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.