बाद होताच पोलार्डनं ब्राव्होच्या पोटावर मारली बॅट, पाहा VIDEO

कॅनडात सुरू असलेल्या टी20 लीगच्या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 12:17 PM IST

बाद होताच पोलार्डनं ब्राव्होच्या पोटावर मारली बॅट, पाहा VIDEO

ओटावा, 01 ऑगस्ट : सध्या कॅनडात टी 20 लीग सुरू आहे. जगभरातील दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. या लीगमध्ये मैदानावरील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. ब्राव्हो विनिपेग हॉक्स संघाकडून खेळत आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात त्यानं वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज पोलार्डची विकेट घेतली. पोलार्ड टोरंटो नॅशनलकडून खेळतो.

ब्राव्होच्या गोलंदाजीवर पोलार्ड झेलबाद झाला. तेव्हा ब्राव्हो आनंद साजरा करत होता. त्यावेळी पोलार्डने ब्राव्होला बॅटनं डिवचलं. याचा व्हिडिओ आता सोशल मडियावर व्हायरल होत आहे. ब्राव्हो विकेट घेतल्यावर नेहमीच त्याच्या स्टाइलने सेलिब्रेशन करतो. आयपीएलमध्येही डान्सची भूरळ अनेकांना पडली होती.

विनिपेग हॉक्स आणि टोरांटो नॅशनल्स यांच्यात झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. हॉक्सने हा सामना जिंकला. त्यांच्याकडून ख्रिस लिनने 48 चेंडूत 89 धावांची केळी केली. तर भारतीय वंशाच्या सनी सोहेलनं 27 चेंडूत 58 धावांची खेळी केली. टोरांटो नॅशनल्सने 20 षटकांत 216 धावा केल्या होत्या. टोरांटो नॅशनल्सकडून युवराज सिंगने 46 तर पोलार्डने 51 धावांची खेळी केली.

धोनीसाठी World Cup मध्ये संघाने तडजोड केली? निवड समितीचे अध्यक्ष म्हणतात...

Loading...

टीम इंडियात विराटचे राज्य, प्रशिक्षकपदाची माळ रवी शास्त्रींच्याच गळ्यात?

VIDEO: नवनीत राणांचा नवा अवतार, पेरणीनंतर आता फवारणी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 12:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...