...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं !

....मग काय प्रत्येकांना सडतोड उत्तर देणाऱ्या पंतप्रधानांनी हे चॅलेंज स्वीकारलं. आणि विराटला ट्विटरमधून उत्तर दिलं.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 24, 2018 01:53 PM IST

...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं !

मुंबई, 24 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे. बुधवारी रात्री विराट कोहलीने त्याचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं होतं, त्याचाच स्वीकार करत विराटने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. आता गंमत म्हणजे हा व्हिडिओ पोस्ट करताना विराटनेही इतरांना चॅलेंज केलं आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांने त्याची पत्नी अनुष्का शर्मा, क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅग केलं आहे. आणि व्यायाम करण्याचं चॅलेंज केलं आहे.

मग काय प्रत्येकांना सडतोड उत्तर देणाऱ्या पंतप्रधानांनी हे चॅलेंज स्वीकारलं. आणि विराटला ट्विटरमधून उत्तर दिलं. #HumFitTohIndiaFit हा हॅशटॅग वापर 'विराट मी चॅलेंज स्वीकारलं, मी लवकरचं माझाही व्हिडिओ शेअर करेन' असं मोदी म्हणाले आहेत. दरम्यान योग दिवसाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी एक अॅनिमेटेड व्हिडिओही शेअर केला आहे.

राजवर्धन सिंह यांनी सुरु केलेल्या या फिटनेस चॅलेंजला जोरदार प्रतिसाद मिळत असतानाच आता नरेंद्र मोदी आपला व्यायाम करतानाचा व्हिडिओ कधी शेअर करणार याचीच उत्सुकता सगळ्यांना आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2018 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...