Home /News /sport /

इंग्लंडच्या कोचनं केली IPL ची प्रशंसा, टीमला नवा सुपरस्टार मिळाल्याची कबुली

इंग्लंडच्या कोचनं केली IPL ची प्रशंसा, टीमला नवा सुपरस्टार मिळाल्याची कबुली

आयपीएल स्पर्धेमुळे (IPL) टीम इंडियालाच नाही तर इंग्लंडला देखील नवा सुपरस्टार मिळाला आहे, अशी कबुली इंग्लंडच्या कोचनं दिली आहे.

    मुंबई, 3 जुलै :  इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची टी20 लीग आहे. या लीगमधील प्रत्येक टीम ही तुल्यबळ असून त्यांच्यात टोकाची स्पर्धा असते. त्यामुळेच जगभरातील क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. भारतीय क्रिकेटला या स्पर्धेमुळे अनेक खेळाडू मिळाले आहेत. आयपीएलमुळे टीम इंडियालाच नाही तर इंग्लंडला देखील नवा सुपरस्टार मिळाला आहे, अशी कबुली काळजीवाहू कोच ग्रॅहम थोर्पेनं (Garham Thorpe) दिली आहे. ग्रॅहम थोर्पेनं सांगितलेला इंग्लंडचा सुपरस्टार सॅम करन (Sam Curran) आहे. करन 2020 पासून महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) कॅप्टन असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा सदस्य आहे. करननं काही महिन्यांपूर्वी भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये आक्रमक बॅटींग करत इंग्लंडला विजयाच्या जवळ आणले होते. त्यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत जोरदार कामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये करननं 48 रन देत 5 विकेट्स घेतल्या. तो गेल्या काही महिन्यांमध्ये इंग्लंडचा भरवशाचा ऑल राऊंडर बनला आहे. त्याच्या या प्रगतीचं श्रेय थोर्पेनं आयपीएलला दिलं आहे. "माझ्या मते त्याला आयपीएलमध्ये खेळल्यानं खूप फायदा झाला आहे. त्याच्यात बॅट्समन म्हणून यापूर्वीही क्षमता होती. पण त्याने त्यामध्ये चांगली प्रगती केली आहे. तो आयपीएलमध्ये दबावाच्या परिस्थितीत बॉलिंग करतो. त्यामुळे तो आता आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. वयाच्या 23 व्या वर्षीच त्याला तगडा अनुभव मिळाला आहे," असे थोर्पेनं सांगितले. IND vs SL: रणतुंगाला श्रीलंका बोर्डाचा घरचा आहेर, टीम इंडियाची केली प्रशंसा थोर्पेनं पुढं सांगितलं की, "त्याने क्रिकेटमधील सर्व प्रकारात चांगला खेळाडू म्हणून त्याचा विकास व्हावा अशी इंग्लंडची इच्छा आहे तो सध्या कठोर मेहनत घेत आहे. टी20 मध्ये त्याने चांगली प्रगती केली आहे. तसेच तो आता वन-डे क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध करत आहे. त्याने आता टेस्ट क्रिकेटमध्येही प्रयत्न करायला हवेत." अशी अपेक्षा थोर्पेनं व्यक्त केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, England, Ipl

    पुढील बातम्या