अर्धशतकानंतर पंचांनी दिला चुकीचा निर्णय, बाद होताच मराठमोळ्या क्रिकेटरचा मृत्यू

अर्धशतकानंतर पंचांनी दिला चुकीचा निर्णय, बाद होताच मराठमोळ्या क्रिकेटरचा मृत्यू

पंचांच्या एका चुकीमुळे मराठमोळ्या खेळाडूला गमवावा लागला जीव.

  • Share this:

हैदराबाद, 18 नोव्हेंबर : क्रिकेटच्या मैदानात नेहमीच धक्कादायक प्रसंग घडत असतात. ऐवढेच नाही तर ज्या मैदानावर खेळण्यासाठी खेळाडू जीवाचं रान करतात त्याच मैदानात काही खेळाडूंना आपला जीवही गमवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फिल ह्युजच्या मैदानावरील मृत्यूनंतर क्रिकेटमधील नियमांमध्येही बदल झाले, पण नियतीपुढे कोणाचेच काही चालत नाही. असाच प्रकार हैदराबादमधील एका सामन्यात घडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंचांच्या एका निर्णयामुळं एका मराठमोळ्या खेळाडूला आपला जीव गमवावा लागला.

हैदराबादमध्ये झालेल्या एक क्लब सामन्यात एका क्रिकेटपटूचा मैदानावरच मृत्यू झाला. रविवारी (17 नोव्हेंबर) हैदराबादमधील एकदिवसीय सामन्यात 41 वर्षीय फलंदाज विरेंद्र नाईक यांचा मृत्यू झाला. विरेंद्र हैदराबादच्या मारडपल्ली क्लबकडून क्रिकेट खेळत होते. रविवारी झालेल्या सामन्यात विरेंद्र यांनी आपल्या संघासाठी शानदार अर्धशतकी खेळीही केली. मात्र बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर गेलेला विरेंद्र पुन्हा मैदानावर परतलाच नाही. पॅव्हेलियनमध्ये त्याचा मृत्यू झाला.

वाचा-फेसबुक, ट्विटरला टक्कर देणार विकिपीडियाचा सोशल अवतार WT:Social

वाचा-वडील 94 हजार कोटींचे मालक पण अवघ्या 30 लाखांसाठी IPL खेळत होता मुलगा

हृदय विकाराच्या झटक्यानं झाला मृत्यू

इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलनं दिलेल्या बातमीनुसार विरेंद्र नाईक यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यानं झाला. विरेंद्र यांचे भाऊ अविनाश यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत विरेंद्र गेले काही महिने याच आजारावर औषधे घेत होते. शवविच्छेदनात विरेंद्र यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. विरेंद्र नाईक मुळचा सावंतवाडीचा असून हैदराबादकडून तो क्रिकेट खेळत होता.

वाचा-भावाला आऊट करण्याच्या प्रयत्नात क्रिकेटपटू झाला रक्तबंबाळ, पाहा VIDEO

वाचा-‘संकटमोचक’ मुंबईकरालाच रोहितनं दिला डच्चू, 4 वर्षात फक्त एकदा दिली संधी

मृत्यूआधी केली होती अर्धशतकी खेळी

विरेंद्र नाईक यांनी रविवारी झालेल्या सामन्यात 60 धावांची खेळी केली होती. विरेंद्र नाईक त्यानंतर बाद झाला. विरेंद्र विकेटच्या मागे झेल बाद झाला होता, पंचांच्या निर्णयावर नाखुश होतं त्यांनी मैदानात सोडले होते. मात्र पॅवेलियनमध्ये पोहचताच भिंतीवर डोकं आपटले आणि ते खाली पडले. त्यानंतर लगेचच त्यांच्या सहकार्यांनी दवाखान्यात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहचताच विरेंद्र यांनी मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर हा सामनाच आयोजकांनी रद्द केला. दरम्यान असे पहिल्यांदा झाले नाही की, खेळाडूला मैदानावर जीव सोडावा लागला आहे. हैदराबादमध्येच गेल्या वर्षी डे-नाईट सामन्यादरम्यान एका खेळाडूचा मृत्यू झाला होता. त्याआधी भोपाळमध्ये अरविंद हनोतिया नावाच्या खेळाडूनं मैदानात शेवटचा श्वास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2019 01:49 PM IST

ताज्या बातम्या