मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'अनेकांच्या मते तो टेस्टसाठी लायक नव्हता', पंतच्या निवडीवरून झाला होता वाद; वाचा Inside Story

'अनेकांच्या मते तो टेस्टसाठी लायक नव्हता', पंतच्या निवडीवरून झाला होता वाद; वाचा Inside Story

निवड समितीची माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) निवडीबाबत मोठा खुलासा केला आहे.

निवड समितीची माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) निवडीबाबत मोठा खुलासा केला आहे.

निवड समितीची माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) निवडीबाबत मोठा खुलासा केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 जून: निवड समितीची माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) निवडीबाबत मोठा खुलासा केला आहे. पंतची टीम इंडियात निवड झाली तेव्हा अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आज तो विकेटकिपर आणि बॅट्समन या दोन्ही बाबतीमध्ये यशस्वी झाला आहे. ऋषभ पंत यावर्षी जोरदार फॉर्मात असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) त्याच्यावर टीम इंडियाची मोठी भिस्त आहे.

प्रसाद यांनी 'क्रिकेट डॉट कॉम' शी बोलताना सांगितले की, "आम्ही ऋषभ पंतची निवड केली त्यावेळी मोठा वाद झाला होता. तो टेस्टमध्ये बॅटींग करु शकणार नाही, तसेच अवघड पिचवर विकेटकिपिंग करू शकत नाही, असे अनेकांनी सांगितले होते. आज  काय चित्र आहे? त्याने भारतामध्ये इंग्लंड विरुद्ध चांगली विकेटकिंपिंग केली. इतकच नाही तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जोरदार बॅटींग केली."

विदेशात संधी देण्याचा निर्णय

खेळाडूंची क्षमता ओळखणे हे निवड समितीच्या सदस्याचं काम आहे, असे प्रसाद यांनी सांगितले. "पंत इतका चांगला खेळेल असा अनेकांनी विचार केला नव्हता. आम्ही पंतला विदेशात खेळण्याची संधी दिली. तिथं विकेटकिपिंग करणे इतके अवघड नाही. तिथे बॅटींग अधिक महत्त्वाची असते. त्याने विदेशात चांगली बॅटिंग करत स्वत:ला सिद्ध केले. त्यावेळी एक विकेटकिपर म्हणून ऋद्धीमान साहा पंतपेक्षा पुढे होता. ' असे प्रसाद यांनी सांगितले.

सौरव गांगुलीने पुन्हा अपलोड केला 'तो' फोटो, आधी झाला ट्रोल आता होतेय प्रशंसा

'ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चांगल्या कामगिरीमुळे पंतवरील टीम मॅनेजमेंटचा विश्वास वाढला. त्यानंतर त्याने यावर्षी इंग्लंड विरुद्ध ज्या पद्धतीन विकेटकिपींग केली, ते आपण पाहिले आहे.' असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. ऋषभ पंतने ब्रिस्बेन टेस्टमध्ये अर्धशतक झळकावत टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) त्याने दिल्ली कॅपिटल्स (DC) टीमचे नेतृत्त्व केले आहे.

First published:

Tags: Cricket, Rishabh pant, Team india