Home /News /sport /

IPL च्या यशानं पाकिस्तानचा जळफळाट, अडथळा आणण्यासाठी सुरू आहेत प्रयत्न

IPL च्या यशानं पाकिस्तानचा जळफळाट, अडथळा आणण्यासाठी सुरू आहेत प्रयत्न

भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) क्रिकेट विश्वाला पुन्हा एकदा आपली शक्ती दाखवून दिली आहे. बीसीसीआयच्या या यशावर पाकिस्तानचा जळफळाट होत आहे.

    मुंबई, 16 जून : भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) क्रिकेट विश्वाला पुन्हा एकदा आपली शक्ती दाखवून दिली आहे. आयपीएल (IPL) स्पर्धेच्या पुढील पाच वर्षांच्या मीडिया राईट्सची विक्रमी विक्री झाली आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठेची आणि श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सर्वच देशांचे क्रिकेटपटू प्रयत्न करत असतात.  क्रिकेटपटूंची ही भावना लक्षात घेऊन आयसीसीनं (ICC) पुढील फ्यूचर टूर प्रोग्रॅममध्ये (FTP) आयपीएल स्पर्धेसाठी अडीच महिन्यांची विंडो राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी ही माहिती दिली आहे. जय शहा यांनी या विषयावर पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ' पुढील एफटीपी सायकलपासून आयपीएल स्पर्धेसाठी अडीच महिन्यांची विंडो असेल. त्यामुळे सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सना यामध्ये खेळता येईल. आम्ही अन्य बोर्ड आणि आयसीसीसीशी या विषयावर चर्चा केली आहे. पाकिस्तानचा जळफळाट पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धेला अडीच महिन्यांची विंडो आसीसीनं निश्चित करताच त्यांचा जळफळाट झाला आहे. या विषयावर आणखी चर्चा करण्याची गरज पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं  (PCB) व्यक्त केली आहे. पीसीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'बर्मिंगहममध्ये जुलै महिन्यांत होणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेच्या वेळी आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल. क्रिकेटमध्ये पैसा येतोय ही चांगली गोष्ट आहे. पण, आयपीएलसाठी दरवर्षी प्रमुख खेळाडूंना संपूर्ण बुक करण्याच्या बीसीसीआयच्या योजनेमुळे द्विपक्षीय मालिकेवर परिणाम होईल.' IPL Media Rights : क्रिकेट फॅन्सचा आनंद आणखी वाढणार, नीता अंबानी जाहीर केलं मिशन भारताबरोबर तसंच आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी नसल्यानंच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा जळफळाट होत असून ते आयसीसीच्या निर्णयात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मानलं जात आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यात परवानगी नाही. यापूर्वी आयपीएल 2008 मध्ये शोएब अख्तर, सोहेल तन्वीर, शाहिद आफ्रिदी हे प्रमुख पाकिस्तानी खेळाडू खेळले होते.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: BCCI, Icc, Ipl, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या