Cricket: 19 धावात बाद झाले 6 फलंदाज ; तरी मिळवला ऐतिहासिक विजय!

Cricket: 19 धावात बाद झाले 6 फलंदाज ; तरी मिळवला ऐतिहासिक विजय!

न्यू गिनी संघ प्रथमच टी-20साठी पात्र ठरला आहे.

  • Share this:

दुबई, 28 ऑक्टोबर: क्रिकेटमध्ये अनेक वेळा एखादा छोटा संघ ऐतिहासिक कामगिरी करून जातो. असाच एक सामना रविवारी क्रिकेटच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी सध्या क्वालिफायर (पात्रता फेरी) सामने दुबईत सुरु आहेत. रविवारी झालेल्या एका सामन्यात पापुआ न्यू गिनी संघाने नवा इतिहास रचला. केनियाविरुद्ध झालेल्या सामन्यात न्यू गिनीने 45 धावांनी विजय मिळवत टी-20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरला. न्यू गिनी संघ प्रथमच टी-20साठी पात्र ठरला आहे.

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यू गिनीने 19.3 षटकात 118 धावा केल्या होत्या. विजयासाठी 119 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या केनियाचा संघ 73 धावांवर बाद झाला. या सामन्यात एक वेळ अशी आली होती की जेव्हा न्यू गिनीचा संघाच विजय होईल असे कोणालाच वाटले नव्हते. प्रथम फलंदाजी करताना न्यू गिनीचे अवस्था 6 बाद 19 अशी झाली होती. न्यू गिनीला अर्धशतक करता येईल का असे वाटत असताना 8व्या क्रमांकावर आलेल्या नॉरमन वॅनुआ याने 48 चेंडूत 54 धावांची खेळी करत संघाला 118 या समाधानकारक स्थितीत पोहोचवले. नॉरमन याने 2 षटकार आणि 3 चौकार मारले.

नॉरमनच्या या खेळीनंतर न्यू गिनीच्या गोलंदाजांनी कमला केली. पोकाना आणि वाला या दोघांनी भेदक गोलंदाजीकरत प्रत्येकी 3 विकेट गेतल्या. अर्धशतक करणाऱ्या नॉरमनने देखील दोन विकेट घेत कमाल केली. गोलंदाजाच्या या कामगिरीमुळे न्यू गिनीने ऐतिहासिक असा विजय मिळवत वर्ल्डकपसाठी पात्र फेरी पार केली. ए ग्रुपमध्ये 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवत अव्वल स्थान मिळवले.

न्यू गिनीसह आयर्लंडने देखील टी-20 वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी पार केली. ग्रुप बीमध्ये त्यांनी 6 पैकी 4 विजयासह अव्वल स्थान मिळत पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 10:41 AM IST

ताज्या बातम्या