पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत

अाध्यात्मिक गुरू बुशरा मनेकाशी इम्रान खानने लग्न केले असून लाहोरमध्ये मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

  • Share this:

19 फेब्रुवारी : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा विरोधी पक्षनेते इम्रान खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला. अाध्यात्मिक गुरू बुशरा मनेकाशी इम्रान खानने लग्न केले असून लाहोरमध्ये मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

जानेवारीमध्ये इम्रान खान यांनी बुशरा मनेका या महिलेला लग्नासाठी विचारले होते. मनशांतीसाठी काही तंत्र शिकून घेण्यासाठी इम्रान खान मनेका यांच्याकडे जात होते. मनेका या अध्यात्मिक गुरू असून त्यांना पहिल्या पतीकडून पाच मुले आहेत.

वयाच्या चाळीशीत असलेल्या बुशरा मनेका यांनी मुलांशी आणि कुटुंबीयांशी बोलून लग्नाबाबत निर्णय घेऊ असं सांगितले होतं. अखेर बुशरा मनेका यांनी होकार दिला असून लाहोरमध्ये इम्रान खानच्या भावाच्या घरी साधेपणाने निकाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला मोजकी मंडळीच उपस्थित होती.

इम्रान खान यांच्या लग्नाचे छायाचित्र 'तेहरीक- ए- इन्साफ' या पक्षाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहेत.

दरम्यान, इम्रान खान यांचं पहिले लग्न जेमिमा गोल्डस्मिथशी झालं होतं. नऊ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर २०१५ मध्ये त्यांनी पत्रकार रेहम खान यांच्याशी लग्न केले. मात्र १० महिन्यांतच त्यांनी घटस्फोट घेतला होता..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2018 10:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading