Home /News /sport /

PAK vs WI : पाकिस्तान टीममध्ये दुर्घटना, डोक्याला बॉल लागल्यानं खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल

PAK vs WI : पाकिस्तान टीममध्ये दुर्घटना, डोक्याला बॉल लागल्यानं खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल

वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी (Pakistan Cricket Team) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या दौऱ्यावरील एका बॅट्समनला बॉल लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

    मुंबई, 31 जुलै : वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी (Pakistan Cricket Team) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या टीमचा मिडल ऑर्डर बॅट्समन आझम खानच्या (Azam Khan) डोक्याला प्रॅक्टीस करताना बॉल लागला आहे. त्यानंतर त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. या दुर्घटनेमुळे आझम दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यातून आऊट झाला आहे. 22 वर्षांच्या आझमनं याच महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) आझमच्या दुखापतीबद्दल एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, 'आझमला 24 तास न्यूरोसर्जनच्या देखभालीमध्ये ठेवण्यात येणार आहे. सोमवारी त्याची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येईल. त्यानंतर तो चौथ्या आणि पाचव्या टी20 सामन्यात खेळणार का? याचा निर्णय घेतला जाईल. आझमच्या डोक्यावर बॉल लागला त्यावेळी त्यानं हेल्मेट घातलं होत, अशी माहिती इएसपीएन क्रिकइन्फोनं दिली आहे. निवडीच्या वेळी झाला होता वाद आझम खान हा पाकिस्तानचा माजी विकेट किपर मोईन खानचा मुलगा आहे. त्याची राष्ट्रीय टीममध्ये  निवड झाल्यानंतर मोठा वाद झाला होता. त्याची वशिल्यानं निवड झाल्याचा आरोपही करण्यात आला. आझमचा देशांतर्गत रेकॉर्ड देखील फार खास नाही.  तो फक्त 1 फर्स्ट क्लास आणि 15 लिस्ट ए श्रेणीच्या सामने खेळला आहे. तो 44 टी 20 सामने खेळला असून त्यामध्ये त्याची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. 140 किलो वजन आझम खानवर त्याच्या वजनामुळे देखील मोठी टीका झाली आहे. त्याचे वजन काही महिन्यांपूर्वी 140 किलो होते. त्यानंतर त्यानं ते 30 किलो कमी केले असून सध्या त्याचे वजन 110 किलो आहे. ज्या खेळाडूसाठी विराटची 28 कोटी मोजण्याची होती तयारी तो अखेर निवृत्त वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला. दोन्ही देशांमध्ये टी 20 सामन्यांच्या मालिकेनंतर दोन टेस्ट सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका 12 ऑगस्टपासून सुरू होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Pakistan

    पुढील बातम्या