मुंबई, 17 जुलै : इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात पाकिस्तानकडून (England vs Pakistan, 1st T20I) एका तरुण बॅट्समननं पदार्पण केले. तो तरुण अन्य कोणी नाही तर पाकिस्तानचा माजी विकेट किपर मोईन खानचा (Moin Khan) मुलगा आझम खान (Azam Khan) आहे. आझमला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सर्फराज अहमद (Sarfaraz Ahmed) याने टीमची कॅप दिली. सरफाराज हा PSL स्पर्धेत क्वेटा ग्लॅडिएटर्स टीमचा कॅप्टन असून आझम त्याच टीमचा सदस्य आहे.
आझम खान त्याच्या निवडीनंतर खेळातील कामगिरीमुळे नाही तर वजनामुळे चर्चेत आला. त्याचे यापूर्वीचे वजन 140 किलो होते. त्याचे या मुद्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाले होते. इतकंच नाही तर त्याच्या फिटनेसवरही शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर त्याने 30 किलो वजन कमी केले आहे. आझमनं शुक्रवारी पाकिस्तानकडून पदार्पण केले त्यावेळी त्याचे वजन 110 किलो होते.
आझमचा खराब रेकॉर्ड
आझमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर चौकार लगावत खातं उघडलं. त्याने 3 बॉलमध्ये नाबाद 5 रन काढले. 22 वर्षाच्या आझमनं आजवर फक्त 1 फर्स्ट क्लास मॅच खेळली आहे. तसच 15 लिस्ट A आणि 41 टी20 सामने खेळले आहेत. या सर्व प्रकारात त्याची सरासरी 30 पेक्षा कमी आहे.
England won the toss and choose to field azam khan make dabuet pic.twitter.com/hPUnFvdifr
— Sheryar Ahmed (@Sheryar23635358) July 16, 2021
पाकिस्तानचा विजय
वन-डे क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या बी टीमकडून सपेशल पराभूत झाल्यानं पाकिस्तानच्या टीमवर जोरदार टीका होत होती. या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्ताननं टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. नॉटिंगहममध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचा 31 रननं पराभव केला. बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांची आक्रमक अर्धशतकं हे पाकिस्तानच्या विजयाचे मुख्य वैशिष्ट्य होते.
WI vs AUS : पंजाबच्या खेळाडूनं एका हातानं झेपावत घेतला थरारक कॅच, पाहा VIDEO
पहिल्यांदा बॅटींगला उतरलेल्या पाकिस्तानी सुरुवात आक्रमक झाली. बाबर-रिझवान जोडीनं इंग्लंडच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. शेवटच्या वन-डेमध्ये 158 रनची खेळी करणाऱ्या बाबर आझमनं टी20 मध्येही तो फॉर्म कायम ठेवला. बाबरने 49 बॉलमध्ये आठ फोर आणि तीन सिक्सच्या मदतीनं 85 रन काढले. त्याने रिझवानसोबत पहिल्या विकेटसाठी 150 रनची पार्टनरशिप केली. रिझवानने 41 बॉलमध्ये 63 रन काढले. या दोघांच्या आक्रमक खेळीमुळे पाकिस्ताननं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 232 रन काढले. ही त्यांची टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, England, Pakistan