• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • BAN vs PAK: सानिया मिर्झाच्या मुलाची तब्येत बिघडली, शोएब मलिक बांगलादेशहून तातडीनं दुबईला रवाना

BAN vs PAK: सानिया मिर्झाच्या मुलाची तब्येत बिघडली, शोएब मलिक बांगलादेशहून तातडीनं दुबईला रवाना

भारतीय टेनीसपटू सानिया मिर्झाचा (Sania Mirza) मुलगा इजहानची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे शोएब मलिकला (Shoaib Malik) बांगलादेशचा दौरा अर्धवट सोडावा लागला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 नोव्हेंबर: भारतीय टेनीसपटू सानिया मिर्झाचा (Sania Mirza) मुलगा इजहानची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे सानियाचा नवरा आणि इजहानचा बाप शोएब मलिकला (Shoaib Malik) बांगलादेशचा दौरा अर्धवट सोडावा लागला आहे. शोएब बांगलादेश विरुद्ध होणारा तिसरा टी20 सामना खेळणार नाही. मुलाच्या तब्येतची माहिती मिळताच शोएब तातडीनं ढाक्याहून दुबईला रवाना झाला आहे. तीन टी20 सामन्यांची मालिकेत पाकिस्ताननं यापूर्वीच 2-0 नं आघडी घेतली आहे. शोएब त्याची पत्नी सानिया आणि मुलगा इजहानसह दुबईत राहतो. इजहानचा जन्म 2018 साली झाला असून तो आता तीन वर्षांचा आहे. यापूर्वी यूएईमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सानिया मिर्झा शोएबला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. शोएबची खराब कामगिरी पाकिस्तान टीममधील अनुभवी खेळाडू असलेल्या शोएब मलिकनं बांगलादेश विरुद्धच्या सीरिजमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिल्या टी-20 सामन्यामध्ये शोएब मलिकने निष्काळजीपणा दाखवला आणि रन आऊट झाला. बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमानने टाकलेला बॉलवर शोएब मलिकने बचावात्मक फटका लगावला होता. हा बॉल विकेट कीपर नुरुल हसनजवळ गेला, त्यावेळी शोएब क्रीजबाहेर उभा होता. मॉर्निंग वॉकला गेल्यासारखा शोएब मलिक क्रीजच्या बाहेर फिरत होता, नुरुल हसनने याचा फायदा घेतला आणि बॉल स्टम्पवर मारला. शोएब मलिकने बॅट क्रीजमध्ये टेकवण्याच्या आधीच बेल्स पडल्या होत्या, यानंतर थर्ड अंपायरने मलिकने त्याला आऊट दिलं. 3 बॉलमध्ये एकही रन न करता शोएब मलिक पॅव्हेलियनमध्ये परतला. शोएब मलिकच्या अशापद्धतीने आऊट होण्यावर जोरदार टीका झाली होती. IND vs NZ: युजवेंद्र चहलबाबत दिनेश कार्तिकनं केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला... त्यापूर्वी शोएबनं नुकत्याच संपलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक कामगिरी केली होती. 6 सामन्यांमध्ये 181 च्या स्ट्राईक रेटने त्याने 100 रन केले, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता.
  Published by:News18 Desk
  First published: