• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • तालिबानचा क्रिकेटला फटका, पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय! अफगाणिस्तानकडं केली 'ही' मागणी

तालिबानचा क्रिकेटला फटका, पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय! अफगाणिस्तानकडं केली 'ही' मागणी

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं (Taliban)आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अडथळा आणण्यास सुरुवात केली आहे.

 • Share this:
  लाहोर, 21 ऑगस्ट : अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं (Taliban)आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अडथळा आणण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) शनिवारपासून सुरू होणारा ट्रेनिंग कॅम्प स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणारी वन-डे सीरिज त्यामुळे संकटात सापडली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (ACB) वतीनं श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. ही सीरिज होणार की नाही याबाबत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी पाकिस्ताननं केली आहे. 'अफगाणिस्तानचे खेळाडू काबूलहून कोलंबोला कधी रवाना होणार याबाबत कोणतीही माहिती अफगाणिस्तान बोर्डानं अजून दिलेली नाही. तसंच या सीरिजचं वेळापत्रकही अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. याबाबतची अधिकृत माहिती मिळताच या  कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असून टीम देखील जाहीर करण्यात येईल', असे  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. अमेरिका आणि तालिबानशी चर्चा याबात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ACB तालिबान आणि अमेरिकी सैन्याशी चर्चा करत आहे. या दोघांकडून सध्या काबूल विमानतळाचं व्यवस्थापन करण्यात आले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, 'आम्हाला लवकरच या विषयाची संपूर्ण माहिती मिळेल. त्यानंतर आमचे खेळाडू कोलंबोला रवाना होतील.' पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कॅप्टन बाबर आझम, मोहम्मद रिझवान, हसन अली आणि शाहिन आफ्रिदी या सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी हे खेळाडू ताजे राहावेत म्हणून त्यांना विश्रांती देण्यात येणार आहे. यूएई आणि ओमान या देशांमध्ये हा वर्ल्ड कप होणार असून पाकिस्तानची पहिली मॅच 24 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध होणार आहे. श्रीलंका क्रिकेटमधील वादावर अखेर तोडगा, 13 हजार रन करणाऱ्या खेळाडूला वगळले तालिबानचा क्रिकेटवर ताबा अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबाननं (Taliban) तेथील क्रिकेट बोर्डावरही ताबा मिळवला आहे. तालिबानचे दहशतवादी गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (ACB) कार्यालयात घुसले. सोशल मीडियावर याचा एक फोटो व्हायरल (Photo Viral) झाला आहे. यामध्ये तालिबानी दहशतवादी एके-47 रायफल घेऊन क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात घुसले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: