NZ vs PAK : न्यूझीलंड सरकारचा पाकिस्तानला दणका, टीमबाबत घेतला हा निर्णय

NZ vs PAK : न्यूझीलंड सरकारचा पाकिस्तानला दणका, टीमबाबत घेतला हा निर्णय

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान टीमच्या (New Zealand vs Pakistan) अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

  • Share this:

ऑकलंड, 4 डिसेंबर : न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान टीमच्या (New Zealand vs Pakistan) अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. न्यूझीलंड सरकारने पाकिस्तानी टीमला सराव करायला मनाई केली आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाकिस्तानी खेळाडू कोरोना पसरवू शकतात, अशी भीती न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाला आहे. पाकिस्तानची टीम मागच्या 10 दिवसांपासून क्वारंटाईन आहे. एकाच वेळी त्यांचे 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर आणखी एका खेळाडूला कोरोना झाल्याचं समजलं.

न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार सध्या पाकिस्तानी टीमला सराव करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सराव केला तर इतर खेळाडूंनाही कोरोना होईल, अशी भीती आरोग्य अधिकाऱ्यांना वाटत आहे. वेळापत्रकानुसार पाकिस्तानी टीमला कोरोना टेस्टनंतर तिसऱ्या दिवशी सराव करण्याची परवानगी मिळाली होती. पण एकाचवेळी 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना अजून सरावासाठी मैदानात उतरला आलं नाही. मागचे 10 दिवस पाकिस्तानची टीम क्वारंटाईन आहे.

न्यूझीलंडने दिला होता इशारा

मागच्याच आठवड्यात न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेट टीमला इशारा दिला होता. न्यूझीलंड सरकारला पाकिस्तानी टीम राहत असलेल्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं. हॉटेलमध्ये खेळाडू एकमेकांची भेट घेत आहेत आणि एकत्र जेवण करत असल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. पाकिस्तानचे खेळाडू कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. पाकिस्तानी टीमने आता नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना परत पाकिस्तानला पाठवलं जाईल, असा निर्वाणीचा इशारा न्यूझीलंडने पाकिस्तानी टीमला दिला होता.

शोएब अख्तरची नाराजी

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या या धमकीवर नाराजी जाहीर केली होती. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सुधारावं, असा सल्ला शोएबने दिला होता. पाकिस्तानची टीम राष्ट्रीय टीम आहे, कोणतीही क्लब टीम नाही. पाकिस्तान टीम कठीण काळात तुमच्याकडे खेळायला आली आहे. प्रसारणाच्या अधिकारातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत, असं शोएब त्याच्या युट्युब चॅनलवर म्हणाला होता.

Published by: Shreyas
First published: December 4, 2020, 12:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या