मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PSL 2021: खेळाडूंना धोका वाढल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घ्यावा लागला मोठा निर्णय!

PSL 2021: खेळाडूंना धोका वाढल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घ्यावा लागला मोठा निर्णय!

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेमध्ये (PSL) सहभागी झालेले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षिततेसाठी खास बायो बबल तयार करण्यात आले होते. या बायो बबलमधील आणखी तीन जणांना कोरोना व्हायरसची (Covid-19) लागण झाल्याचं गुरुवारी उघड झाले.

  • Published by:  News18 Desk

लाहोर, 04 मार्च : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) धोका अजूनही संपलेला नाही. कोरोनामुळे मागच्या वर्षी अनेक स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. या वर्षी देखील कोरोनाच्या धोक्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं  दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला. त्याबाबतचा वाद अजूनही सुरु आहे. हा वाद सुरु असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी पाकिस्तान सुपर लीग 2021 (Pakistan Super League 2021) ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली आहे.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेमध्ये (PSL) सहभागी झालेले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षिततेसाठी खास बायो बबल तयार करण्यात आले होते. या बायो बबलमधील आणखी तीन जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं गुरुवारी उघड झाले. त्यामुळे गेल्या चार दिवसांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची संख्या सात झाली आहे. बुधवारी ज्या मॅच झाल्या त्या टीममधील कोणत्याही सदस्यचा यामध्ये समावेश नाही, अशी माहिती आहे.

कोरोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेऊन ही स्पर्धा सध्या स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. 'सर्व खेळाडूंच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. या सर्व टीममधील खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असून त्यांची इच्छा असेल तर कोरोना लस देखील दिली जाईल, असं पीसीबीनं स्पष्ट केलं आहे.

(हे वाचा- IND vs ENG : भर मैदानात भिडले विराट कोहली आणि बेन स्टोक्स! पाहा VIDEO )

यापूर्वी इस्लामबादच्या टीममधील ऑस्ट्रेलियन स्पिनर फवाद अहमद याला कोरोनाची सर्वप्रथम लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे सोमवारी 1 मार्च 2021 ला होणारा क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड हा सामना एक दिवसांसाठी पुढे ढकलावा लागला होता.

त्यापाठोपाठ कराचीच्या टीममधील दोन विदेशी खेळाडूसह तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. यापैकी इंग्लंडचा खेळाडू टॉम बँटननं आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती नंतर ट्विटरवर जाहीर केली होती.

First published:

Tags: Coronavirus, Cricket, International, Pakistan, Sports