पाकिस्तानच्या शोएब मलिकचा ऐतिहासिक विक्रम, विराट-रोहित जवळपासही नाहीत

पाकिस्तानच्या शोएब मलिकचा ऐतिहासिक विक्रम, विराट-रोहित जवळपासही नाहीत

आयपीएल (IPL 2020)मध्ये दररोज नवनवे विक्रम होत असतानाच तिकडे पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik)ने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

  • Share this:

मुंबई : आयपीएल (IPL 2020)मध्ये दररोज नवनवे विक्रम होत असतानाच तिकडे पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) ने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. शोएब मलिकने टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार रन करणारा शोएब मलिक पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने 404 मॅचमध्ये 38.20च्या सरासरीने 13,296 रन केले आहेत. तर कायरन पोलार्डने 518 मॅचमध्ये 31.51च्या सरासरीने 10,370 रन केले आहेत. या यादीत शोएब मलिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. मलिकने 395 मॅचमध्ये 37.41 च्या सरासरीने 10,027 रन केले आहेत.

न्यूझीलंडच्या ब्रॅण्डन मॅकल्लमला 370 मॅचमध्ये 29.97च्या सरासरीने 9,922 करता आल्या. डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 288 मॅचमध्ये 37.86 च्या सरासरीने 9,533 रन केले आहेत. एरॉन फिंच 292 मॅचमध्ये 35.92च्या सरासरीने 9,161 रन केल्यामुळे सहाव्या क्रमांकावर आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने 286 मॅचमध्ये 41.05च्या सरासरीने 9,033 रन केले आहेत. विराट या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. विराटनंतर रोहितने 334 मॅचमध्ये 32.31च्या सरासरीने 8,853 रन केले आहेत. नवव्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्सला 315 मॅचमध्ये 37.33च्या सरासरीने 8,812 आणि शेन वॉटसनला 338 मॅचमध्ये 29.41 च्या सरासरीने 8,707 रन करता आल्या आहेत.

शोएब मलिकने शनिवारी पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत 10 हजार रनचा टप्पा ओलांडला. पाकिस्तानच्या नॅशनल टी-20 लीगमध्ये मलिकने 44 बॉलमध्ये 74 रनची खेळी केली. मलिकने पाकिस्तानकडून खेळताना 35 टेस्टमध्ये 35.14 च्या सरासरीने 1,898 रन केले, तर 287 वनडेमध्ये 34.55च्या सरासरीने त्याला 7,534 रन करता आले. 116 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये मलिकने 31.13 च्या सरासरीने 2,335 रन केले.

Published by: Shreyas
First published: October 10, 2020, 9:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या