काश्मीर मुद्द्यावरून ईद दिवशीच अख्तर आणि सर्फराज बरळले!

काश्मीर मुद्द्यावरून ईद दिवशीच अख्तर आणि सर्फराज बरळले!

भारतानं काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्याचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : भारतानं काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय पाकिस्तानच्या पचनी पडला नाही. भारताच्या निर्णयानं जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेशांत विभागलं आहे. यामुळं काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान ते तिथले क्रिकेटपटू सर्वांनीच यावर प्रतिक्रिया दिली.

पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणी लक्ष घालावं असं म्हटलं होतं. आता पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फराज अहमदनेही प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी ईद साजरी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सर्फराज म्हणाला की, मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या कठीण काळात आमच्या काश्मीरी बांधवांची मदत कर.

रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनंही यावरून ट्वीट केलं आहे. त्यानं दुखापत झालेल्या लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानं म्हटंल आहे की, बलिदानाचा अर्थ तुम्ही सांगितलात, तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत त्यानं ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताने काश्मीरचा निर्णय घेतल्यानंतर आफ्रीदीनं संयुक्त राष्ट्रसंघावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं थेट संयुक्त राष्ट्रसंघावरच प्रश्न उपस्थित करत युएन झोपले आहे का? असा प्रश्न विचारला. आफ्रिदीनं ट्वीट केलं आहे की, काश्मीरमधील लोकांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावानुसार त्यांचे अधिकार द्यायला पाहिजेत. जसं आपल्या सर्वांना स्वातंत्र्य आहे तसं त्यांनाही हवं. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना का केली आहे? संयुक्त राष्ट्रसंघ झोपा काढत आहे का? काश्मीरमध्ये मानवताविरोधी कृत्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यात मध्यस्ती करावी असंही त्यानं म्हटलं आहे.

आफ्रिदीनं याआधीसुद्धा काश्मीरबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यानं स्वतंत्र काश्मीरचा प्रस्तावही ठेवला होता. लंडनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटलं होतं की, पाकिस्तानला काश्मीर नको आहे. भारतालासुद्धा देऊ नका. काश्मीरला स्वतंत्र ठेवा. यामुळं मानवता जीवंत राहील. पाकिस्तानला त्याचे चार भाग सांभाळणं कठीण आहे. माणुसकी मोठी गोष्ट आहे. काश्मीरमधील लोक मरत असून हे दुर्दैवी आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 मध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. कलम 370 हटवल्यास काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा राहणार नाही. राज्याची स्वतंत्र पोलिस यंत्रणा उरणार नाही. तिथे केंद्राच्या अखत्यारित पोलिस यंत्रणा असेल. नवा कायदा लागू करायचा झाला तर त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज नसेल. त्यामुळं केद्र सरकार राज्यातील कायदा करू शकेल. तसेच कलम 370 हटवल्यानं संपत्ती खरेदी आणि गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.

आता थेट केंद्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये विकासाचे प्रकल्प राबवणार आहे. तसेच त्यांची दिल्लीसारखी परिस्थिती होणार आहे. हे कलम हटवल्यानं भ्रष्टाचाराला आळा बसेल असा दावा सरकारने केला आहे. काश्मीरला यापुढे स्वतंत्र झेंडा लावता येणार नाही. दिल्लीप्रमाणे काश्मीरसुद्धा केंद्रशासित प्रदेश होईल. इथलं कामकाज उपराज्यपालाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अखत्यारीत होईल.

SPECIAL REPORT : लोकांची मनं जिंकण्यासाठी मोदींच्या जेम्स बॉन्डचं 'मिशन काश्मीर'

Published by: Suraj Yadav
First published: August 13, 2019, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading