सचिनच्या बॅटने आफ्रिदीने केलं होतं वेगवान शतक

सचिनच्या बॅटने आफ्रिदीने केलं होतं वेगवान शतक

सचिनने आफ्रिदीला बॅट भेट दिली नव्हती पण ती कशी मिळाली याबद्दल आफ्रिदीनं खुलासा केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 मे : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आलेल्या शाहीद आफ्रिदीने 1996 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 37 चेंडूत शतक साजरं केलं होतं. त्याने ही कामगिरी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या बॅटने केली होती. याबाबतचा खुलासा आफ्रिदीने त्याच्या गेम चेंजर या पुस्तकात केला आहे.

आफ्रिदीने म्हटले आहे की, सचिनला त्याच्याच बॅटसारखी आणखी एक बॅट तयार करायची होती. त्यासाठी वकार यूनुसकडे त्याने बॅट दिली आणि सियालकोटमधून अशी बॅट करून आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी वकार यूनुसने ती बॅट मला दिली होती. त्याच बॅटने नैरोबीत झालेल्या सामन्यात शतक केले.

शाहिद आफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्याच एकदिवसीय सामन्यात शतक केलं होतं. यात त्याने 11 षटकार आणि सहा चौकार मारले होते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आफ्रिदीचा वेगवान शतकाचा विक्रम अँडरसन आणि डीव्हिलियर्सने मोडला.

वाचा : मुंबई इंडियन्सच्या जय-पराजयावर 'या' चार संघांचे लक्ष

विशेष म्हणजे आफ्रिदीने वेगवान शतक करण्याचा विक्रम केला त्याच्या आधी स्वप्न पडल्याचेही त्याने पुस्तकात म्हटले आहे. आफ्रिदीने श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसे काढली होती. जयसुर्याच्या 10 षटकांत 94 तर फिरकीपटू मुरलीधरनच्या गोलंदाजीवर 73 धावा काढल्या होत्या.

वाचा : MIvsKKR : मुंबई इंडियन्सच्या विजयाने बदलणार आयपीएलचा इतिहास

SPECIAL REPORT: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलींकडून दाढी करून घेतो...

First published: May 5, 2019, 1:31 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading