• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • शोएब अख्तरनं गायली किशोर कुमार यांची गाणी, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!

शोएब अख्तरनं गायली किशोर कुमार यांची गाणी, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!

मैदानात आणि मैदानाच्या बाहेर सतत आक्रमक असणाऱ्या शोएब अख्तरची (Shoaib Akhtar) एक वेगळी बाजू दाखवणारा एक जुना व्हिडीओ (Throwback Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 जून: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट बॉलर म्हणून शोएब अख्तर (Shoaib Akhtar) प्रसिद्ध होता. पाकिस्तानचा हा क्रिकेटपटू आता निवृत्त झाला आहे. तो सध्या यूट्यूबच्या (YouTube) माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर मत व्यक्त करत असतो. मैदानात आणि मैदानाच्या बाहेर सतत आक्रमक असणाऱ्या शोएब अख्तरची एक वेगळी बाजू दाखवणारा एक जुना व्हिडीओ (Throwback Video) सध्या व्हायरल झाला आहे. एका पार्टीमधील हा व्हिडीओ आहे. शोएब या पार्टीत त्याच्या मित्रांसोबत मजा करतोय. या पार्टीच्या मुडमध्ये त्याने  किशोर कुमारची (Kishore Kumar) यांची काही गाणी म्हंटली आहेत. राजेश खन्ना यांच्या अनुरोध या चित्रपटातील 'आते जाते खूबसुरत आवारा  सड़को पे कभी कभी इत्तेफ़ाक़ से ....' या गाण्यानं शोएबनं या मैफिलीची सुरुवात केली. त्यानंतर 'दो रास्ते' सिनेमातील 'मेरे नसीब में ऐ दोस्त... हे गाणे देखील शोएबने गायले. WTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी शोएब अख्तर एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं मोहम्मद रफींच्या (Mohammed Rafi) आवाजातील  आणि राजकुमार-मीनाकुमारी जोडीवर चित्रीत झालेलं काजल सिनेमातील 'छु लेने दो नाजुक होठों को हे ' या गाण्याच्या काही ओळी देखील गायल्या. शोएबचा हा आजवर कधीही न पाहिलेला अवतार यूट्यूबवर सुपरहिट झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: