Home /News /sport /

28व्या वर्षीच पाकिस्तानी क्रिकेटपटूची निवृत्ती, PCBवर केले गंभीर आरोप

28व्या वर्षीच पाकिस्तानी क्रिकेटपटूची निवृत्ती, PCBवर केले गंभीर आरोप

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमीर (Mohammad Amir) ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे. सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या टीममध्ये आमीरची निवड झाली नव्हती. त्यानंतर आमीरनं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 17 डिसेंबर : पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमीर (Mohammad Amir) ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे. सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या टीममध्ये आमीरची निवड झाली नव्हती. त्यानंतर आमीरनं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद आमीरनं मागच्या वर्षीच टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आहे. त्याच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता आमीर आणि पीसीबी यांच्यातील संबंध चांगलेच बिघडले असल्याची शक्यता आहे. आमीरचा संयम संपल्यानेच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानच्या मॅनेजमेंटसोबत खेळण्याची आपली इच्छा नसल्याचं आमीरनं स्पष्ट केले आहे. न्यूझीलंड दौऱ्यातून वगळल्यानंतर आमीर नुकताच लंकन प्रीमिअर लीगमध्ये (LPL) सहभागी झाला होता. पाकिस्तानचा पत्रकार शोएब भट्टनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये आमीर लंकेतील गॉल गलॅडीएटर्सट टीमचा प्रचार करताना दिसत होता. आमिरला आता फक्त फ्रँचायझी क्रिकेट खेळायचं आहे, पाकिस्तानकडून खेळण्याची त्याची इच्छा नाही, अशी टीका त्यांनी केली होती. पीसीबीवर केले आरोप आमीरनं रिटायरमेंटचा निर्णय जाहीर करताना पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डावर जोरदार आरोप केले आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या 35 संभाव्य टीममध्येही निवड न होणं हा माझ्यासाठी एक ‘वेक अप’ कॉल होता. मी क्रिकेटपासून दूर गेलेलो नाही. माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. माझं मानसिक शोषण होत आहे. मी आता अधिक सहन करु शकत नाही. सध्याच्या मॅनेजमेंटमध्ये मला खेळणे अशक्य आहे, त्यामुळे मला आता क्रिकेट सोडलं पाहिजे,’’  असे आमिरने सांगितले. आमीरनं वयाच्या 17 व्या वर्षी 2009 साली इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2010 साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानं त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या