पाकिस्तानची जुनी खोड जाईना; नकार दिला लंकेने आरोप मात्र भारतावर!

पाकिस्तानची जुनी खोड जाईना; नकार दिला लंकेने आरोप मात्र भारतावर!

भारताने धमकी दिल्यामुळे श्रीलंकेच्या 10 खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावरून माघार घेतल्याचा आरोप पाकिस्तानच्या एका मंत्र्याने केला आहे.

  • Share this:

कराची, 10 सप्टेंबर: भारताने धमकी दिल्यामुळे श्रीलंकेच्या 10 खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावरून माघार घेतल्याचा आरोप पाकिस्तानच्या एका मंत्र्याने केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास कोणताही संघ जात नाही. आता श्रीलंकेच्या संघाने त्याची तयारी दाखवली होती. पण दौऱ्याआधी संघातील 10 जणांनी माघार घेतल्यामुळे लंकेचा पाक दौराच धोक्यात आल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर आरोप केला आहे.

दहा वर्षापूर्वी म्हणजेच 2009मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या संघावर गद्दाफी मैदानाबाहेर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात लंकेच्या संघातील काही खेळाडू जखमी झाले होते. या घटनेनंतर जगातील सर्व संघाने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तानने अनेक प्रयत्न केल्यानंतर अखेर श्रीलंकेने क्रिकेट खेळण्यास होकार दिला. या दौऱ्याचे स्वरुप निश्चित झाल्यानंतर लंकेच्या 10 खेळाडूंनी पाक दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. लंकेच्या खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणामुळे दौऱ्यातून माघार घेतली असली तरी पाकिस्तानला मात्र यामध्ये भारताचा हात असल्याचे दिसते.

देशात पुन्हा क्रिकेट सुरु करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसेल असे दिसू लागल्यावर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानच्या मंत्र्याने थेट भारतावर आरोप केला आहे. भारताने लंकेच्या खेळाडूंना धमकी दिल्यामुळे त्यांनी दौऱ्यातून माघार घेतल्याचा अजब आरोप मंत्री चौधरी फवाद हुसैन (Fawad Hussain) यांनी केला आहे. हुसैन यांनी ट्विटवर म्हटले आहे की, भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकी दिली आहे. जर ते पाकिस्तान दौऱ्यावर केले तर त्यांचे आयपीएलमधील करार रद्द केला जाईल. हा प्रकार अतिशय घाणेरडा आहे.

भारतावर बेताल आरोप करण्याची हुसैन यांची ही पहिली वेळ नाही. याआधी चांद्रयान 2 मोहिमेसंदर्भात त्यांनी असेच वक्तव्य केले होते. हुसैन यांच्या मते चांद्रयान 2 म्हणजे पैशांचा अपव्याप आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानमधील सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले होते.

असा आहे श्रीलंकेचा दौरा

श्रीलंका संघाच्या पाकिस्तान दौऱ्यात वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. कराची आणि लाहोल येथे प्रत्येकी 3 वनडे आणि टी-20 सामने होणार आहेत. हा दौरा 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. लंकेच्या काही खेळाडूंनी भलेही नाव मागे घेतले असले तरी या दौऱ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा पाकिस्तानने केला आहे.

VIDEO :...तेव्हा जेटलींच्या घराचा आसरा होता, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 07:06 PM IST

ताज्या बातम्या