मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'पाकिस्तानमध्ये येऊन क्रिकेट खेळा', PCB ने या देशाला दिलं निमंत्रण

'पाकिस्तानमध्ये येऊन क्रिकेट खेळा', PCB ने या देशाला दिलं निमंत्रण

सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये कोणत्याच देशाची टीम क्रिकेट खेळण्यासाठी धजावताना दिसत नाही.

सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये कोणत्याच देशाची टीम क्रिकेट खेळण्यासाठी धजावताना दिसत नाही.

सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये कोणत्याच देशाची टीम क्रिकेट खेळण्यासाठी धजावताना दिसत नाही.

कराची, 16 ऑक्टोबर : सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये कोणत्याच देशाची टीम क्रिकेट खेळण्यासाठी धजावताना दिसत नाही. मागच्याच वर्षी श्रीलंकेच्या टीमने पाकिस्तानमध्ये सीरिज खेळली होती. यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंडला 3 टी-20 मॅचसाठी आमंत्रण दिलं आहे. इंग्लंडने जानेवारी महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर यावं, अशी इच्छा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. इंग्लंडने 2005-06 साली टेस्ट आणि वनडे सीरिजसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता.

'आम्ही इंग्लंड क्रिकेट बोर्डाला 13 ते 20 जानेवारीदरम्यान 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवण्यासाठी बोलावलं आहे. या दौऱ्याचा पाकिस्तानने यावर्षी केलेल्या इंग्लंड दौऱ्याशी संबंध नाही,' असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या संकटातही यावर्षी पाकिस्तानची टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर टेस्ट सीरिज खेळण्यासाठी गेली होती.

'जेव्हा आम्ही टीमला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोविड-19 आणि जैव सुरक्षित वातावरणाबाबत आम्ही चिंतेत होतो. तसंच तुम्ही खेळाडूंना संकटात टाकत आहात, असंही अनेक जण म्हणाले. जेव्हा आमचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तेव्हा या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी सोप्या नव्हत्या,' अशी प्रतिक्रिया वसीम खान यांनी दिली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेलं निमंत्रण स्वीकारायचं का नाही? हे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ठरवायचं आहे. इंग्लंड दौऱ्याच्या बदल्यात पाकिस्तान दौऱ्याची चर्चा आम्ही केली नव्हती. आता त्यांनी याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. त्याआधी ते कोरोना आणि सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेतील. इंग्लंडची टीम पाकिस्तान दौऱ्यावर येईल, असा आम्हालाल विश्वास असल्याचं वसीम खान म्हणाले.

First published:
top videos