मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

155 किमी वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानीवर कारवाई, ICC नं केलं निलंबित

155 किमी वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानीवर कारवाई, ICC नं केलं निलंबित

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद हसनैनवर (Mohammad Hasnain) आयसीसीनं (ICC) कारवाई केली आहे. हसनैन यापूर्वी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) 155 किमी/तास वेगाने बॉलिंग केल्यानं चर्चेत आला होता.

    मुंबई, 4 फेब्रुवारी : पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद हसनैनवर (Mohammad Hasnain) आयसीसीनं (ICC) कारवाई केली आहे. लाहोरमध्ये झालेल्या तपासणीत त्याचे बहुतेक बॉल हे नियमांचं उल्लंघन करतात हे सिद्ध झाल्यानंतर आयसीसीनं त्याच्यावर बंदी घातली आहे. हसनैन यापूर्वी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) 155 किमी/तास वेगाने बॉलिंग केल्यानं चर्चेत आला होता. हसनैननं यावर्षीच ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केले होते. बिग बॅशमध्ये त्याने 5 मॅचमध्ये 16 च्या सरासरीनं 7 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याचा इकोनॉमी रेट फक्त 6 आहे. सिडनी थंडरकडून  (Sydney Thunder) खेळलेल्या हसनैनच्या बॉलिंगवर बिग बॅश लीगमध्येच संशय व्यक्त करण्यात आला होता. हसनैनची ऑस्ट्रेलियातच टेस्ट होणार होती. पण, त्या दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) टी20 लीग खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना परत बोलावले आहे. त्यामुळे त्याची टेस्ट लाहोरमध्ये झाली. या टेस्टमध्ये तो दोषी आढळला. अर्थात यावेळी त्याच्या बॉलिंगमध्ये सुधारणा करणे शक्य असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) व्यक्त केले आहे. हसनैन पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आयसीसीच्या नियमानुसार त्याला पाकिस्तानमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी आहे. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ती परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीगमधील उर्वरित सामन्यात तो खेळणार नाही. या कालावधीमध्ये तो बॉलिंगची शैली सुधारण्यावर भर देईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. मित्राच्या मुलानं केली आफ्रिदीची धुलाई, बूम-बूमच्या बॉलिंगवर सिक्सचा पाऊस पाकिस्तानचा तरूण फास्ट बॉलर असलेल्या हसनैननं टी20 कारकिर्दीमध्ये 78 सामन्यात 25 च्या सरासरीने 95 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये त्याचा इकोनॉमी रेट 8.41 इतका आहे. तर पाकिस्तानकडून त्याने 8 वन-डेमध्ये 12 आणि 18 टी20 इंटरनॅशनलमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी20 इंटरनॅशनलमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पाकिस्तानचा सर्वात तरूण खेळाडू आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये श्रीलंकेविरूद्ध त्याने ही कामगिरी केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Icc, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या