Home /News /sport /

155 किमी वेगाने बॉलिंग करणारा पाकिस्तानी संशयात, ICC करणार चौकशी

155 किमी वेगाने बॉलिंग करणारा पाकिस्तानी संशयात, ICC करणार चौकशी

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेतील (Big Bash League) पाकिस्तानी फास्ट बॉलर मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) संशयात सापडला आहे.

    मुंबई, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेतील (Big Bash League) पाकिस्तानी फास्ट बॉलर मोहम्मद हसनैन  (Mohammad Hasnain) संशयात सापडला आहे. हसनैन सिडनी थंडर  (Sydney Thunder) या टीमचा सदस्य आहे. हसनैन यापूर्वी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) 155 किमी/तास वेगाने बॉलिंग केल्यानं चर्चेत आला होता. आता त्याच्या बॉलिंगच्या अ‍ॅक्शनवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे लाहोरमधील आयसीसीनं (ICC) मान्य केलेल्या प्रयोगशाळेत त्याच्या बॉलिंगची तपासणी होईल. हसनैनं या सिझनमध्येच बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केले आहे. त्याने 5 मॅचमध्ये 16 च्या सरासरीनं 7 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट फक्त 6 आहे. 'क्रिकइन्फो' नं दिलेल्या बातमीनुसार 15 जानेवारी रोजी सिडनी सिक्सर्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. या मॅचच्या दरम्यान सिक्सर्सचा कॅप्टन मोईसेस हेन्रिक्स याने त्याच्या बॉलिंगवर 'नाईस थ्रो मेट' अशी शेरेबाजी केल्याचे स्टम्प माईकवर रेकॉर्ड झाले. त्यानंतर हसनैन संशयात सापडला. हसनैनची बुधवारी ऑस्ट्रेलियातच टेस्ट होणार होती. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) टी20 लीग खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना परत बोलावले आहे. त्यामुळे त्याची टेस्ट आता लाहोरमध्ये होईल. पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील क्वेटा ग्लॅडिएटर्स टीमचा हसनैन महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या बॉलिंग अ‍ॅक्शनमध्ये दोष आढळल्यास तो ती नीट करेपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास अपात्र असेल. IND vs SA, Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य पाकिस्तानचा तरूण फास्ट बॉलर असलेल्या हसनैननं टी20 कारकिर्दीमध्ये 74 सामन्यात 25 च्या सरासरीने 92 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये त्याचा इकोनॉमी रेट 8.41 इतका आहे. तर पाकिस्तानकडून त्याने 8 वन-डेमध्ये 12 आणि 18 टी20 इंटरनॅशनलमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Icc, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या