मोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....

मोहम्मद आमीरचं IPL खेळण्यासाठी एक पाऊल पुढे, मुंबईच्या खेळाडूंबद्दल म्हणाला....

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमीर (Mohammad Amir) याने वयाच्या 28 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर त्याला आयपीएल स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे.

  • Share this:

लंडन, 14 मे : पाकिस्तानचा  फास्ट बॉलर मोहम्मद आमीर (Mohammad Amir) याने वयाच्या 28 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर त्याला आयपीएल स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. पण, आयपीएलमध्ये खेळण्यास पाकिस्तानच्या खेळाडूंना परवानगी नाही. ही अडचण दूर करण्यासाठी आमीरनं एक मार्ग शोधला आहे.

आमीरनं गुरुवारी इंग्लंडच्या नागरिकत्वासाठी (England citizenship) अर्ज केला आहे. आमीरचा हा अर्ज मंजूर झाला तर त्याच्यासाठी क्रिकेट खेळण्याचे नवे मार्ग सुरु होतील. तो इंग्लिंश कौंटीमध्ये खेळू शकेल. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्येही त्याला खेळता येणार आहे.

आमीरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, 'मी बराच काळ इंग्लंडमध्ये राहणार आहे, इकडे मला क्रिकेट एन्जॉय करायचं आहे. पुढची 6-7 वर्ष मला आणखी खेळायचं आहे. माझी मुलं इंग्लंडमध्येच मोठी होतील आणि इकडेच शिक्षण घेतील, त्यामुळे मी इकडेच राहणार यात शंका नाही,'  असं सांगितलं होतं. आमीरने डिसेंबर 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. यासाठी त्याने पाकिस्तानचा प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूसला दोष दिला होता.

भारत- इंग्लंडकडून शिका

आमिरनं 'पाक पॅशन डॉट कॉम' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तान क्रिकेटवर टीका केली आहे. 'पाकिस्तानमध्ये क्रिकेटपटूंना अगदी कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी दिली जाते. पाकिस्तानच्या निवड समितीनं अन्य मजबूत टीमकडून शिकायला हवं. भारत, इंग्लंड, न्यूझीलंडकडं पाहा. त्याचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी एकदम तयार असतात. याचं कारण म्हणजे ते देशांतर्गत पातळीवर भरपूर क्रिकेट खेळतात. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये जे शिकलं असतं त्याचं प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर करतात.' असं आमिरनं सांगितलं.

बाप होण्याचा आनंद! पॅट कमिन्सनं प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट

मुंबईच्या खेळाडूंचं कौतुक

आमीरनं यावेळी बोलताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचं देखील कौतुक केलं. 'पाकिस्तानच्या खेळाडूंना वाटतं की ते राष्ट्रीय कोचकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत क्रिकेट शिकतील. भारताच्या सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पांड्याकडं पाहा त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी त्यांना कोचच्या मदतीची फार गरज आहे, असं वाटलंच नाही. त्यांना बराच काळ देशांतर्गत क्रिकेट खेळलंय, तसंच आयपीएलमुळे त्यांना मदत झाली आहे.' असा दावा आमीरनं केला.

Published by: News18 Desk
First published: May 14, 2021, 9:19 AM IST

ताज्या बातम्या