लाहोर, 11 जानेवारी: पाकिस्तानचा माजी कॅप्टन शोएब मलिक (Shoaib Malik) एका भीषण अपघातामध्ये थोडक्यात वाचला. लाहोरमध्ये शोएबच्या कारचा अपघात झाला. शोएबची कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झाचा (Sania Mirza) पती असलेला शोएब पाकिस्तान सुपर लिगच्या कार्यक्रमातून घरी परतत असताना हा अपघात झाला.
गाडीला ओव्हरटेक करताना अपघात
पाकिस्तानचे न्यूज चॅनल ‘समा टीव्ही’नं दिलेल्या वृत्तानुसार मलिक पाकिस्तान सुपर लिगच्या कार्यक्रमात गेला होता. त्या कार्यक्रमात त्याच्या स्पोर्ट्स कारची मोठी चर्चा झाली. मोहम्मद आमिर आणि बाबर आझम यांनी त्याची कार आवर्जून पाहिली. हा कार्यक्रम संपल्यानंतर वहाब रियाझ आणि शोएब मलिक आपआपल्या कारमधून घरी निघाले. त्यावेळी त्यांच्या कारमध्ये रेस सुरू झाली.
या रेसच्या दरम्यान अचानक शोएबच्या गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यावरील काही गाड्यांना धडकत बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या अपघातामध्ये कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला.
Shoaib Malik perfectly fine, Car accident but thank God he is fine, Car badly damaged. pic.twitter.com/iU4NtumKxY
— Abdul Ghaffar (@GhaffarDawnNews) January 10, 2021
सुदैवानं शोएबला यामध्ये कोणती दुखापत झाली नाही. या अपघातानंतर मी पूर्णपणे बरा आहे, असं ट्विट शोएबनं केलं आहे.
- "I am perfectly all right everybody. It was just a happenstance accident and Almighty has been extremely Benevolent. Thank you to each one of you who've reached out. I am deeply grateful for all the love and care..." ~ Shoaib Malik
— Shoaib Malik 🇵🇰 (@realshoaibmalik) January 10, 2021
शोएब मलिक गेल्या 21 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. पाकिस्तानच्या या ऑल राऊंडरनं 35 टेस्टमध्ये 1898 रन केले आहेत तर 32 विकेट्स घेतल्या आहेत. मलिकनं 287 वन डे आणि 116 टी 20 मध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. वन डे मध्ये मलिकनं 7534 रन आणि 158 विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.