मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तान क्रिकेटमध्ये राडा, PCB अध्यक्ष आणि PSL फ्रँचायझी मालकांमध्ये शिवीगाळ

पाकिस्तान क्रिकेटमध्ये राडा, PCB अध्यक्ष आणि PSL फ्रँचायझी मालकांमध्ये शिवीगाळ

भारतामध्ये आयपीएल स्पर्धेची (IPL 2022) तयारी सुरू झालेली असताना पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super league) स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पण, या तयारीच्या दरम्यान मोठा राडा झाला आहे.

भारतामध्ये आयपीएल स्पर्धेची (IPL 2022) तयारी सुरू झालेली असताना पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super league) स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पण, या तयारीच्या दरम्यान मोठा राडा झाला आहे.

भारतामध्ये आयपीएल स्पर्धेची (IPL 2022) तयारी सुरू झालेली असताना पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super league) स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पण, या तयारीच्या दरम्यान मोठा राडा झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 नोव्हेंबर:  आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनची (IPL 2022) तयारी सुरू झाली आहे. या सिझनपूर्वी खेळाडूंचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction 2022) होणार आहे. आयपीएलच्या 8 जुन्या फ्रँचायझींना खेळाडू रिटेन करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुढील आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या टीम पहिल्यांदाच खेळणार आहेत. भारतामध्ये आयपीएल स्पर्धेची तयारी सुरू झालेली असताना पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super league) स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. पण, या तयारीच्या दरम्यान मोठा राडा झाला आहे.

काय घडला प्रकार?

पीएसएल (PSL) टीममधील खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेवरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राझा  (Ramiz Raja) आणि फ्रँचायझी मालकांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली असे वृत्त 'द न्यूज' ने दिले आहे.

पीएसएलच्या सातव्या सिझनचा ड्राफ्ट जारी होण्यापूर्वी खेळाडूंना देण्यात येणारी रक्कम वाढवण्यात यावी असा प्रस्ताव राजा यांनी सादर केल्यानंतर हा वाद सुरू झाला. 'जगातील प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळावं यासाठी हा एकमेव मार्ग आहे,' असा राजा यांनी सांगितले. खेळाडूंना अधिक पैसा देण्याची राजा यांची सूचना फ्रँचायझी मालकांना आवडली नाही.

तुम्ही तर घुसखोर..

पीसीबीच्या सुत्रांच्या आधारे देण्यात आलेल्या या बातमीमध्ये रमीझ राजा या बैठकीत चांगलेच संतापले असा दावा करण्यात आला आहे. पीएसएल आमचं घर आहे, तुम्ही या घरात घुसखोरी केली आहे. या शब्दात राजा यांनी फ्रँचायझी मालकांना सुनावले. इतकेच नाही तर तुम्ही आमच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे तोडले आहेत, असा आरोपही राजा यांनी केला. राजा यांचा हा आरोप बैठकीला उपस्थित असलेल्या फ्रँचायझी मालकांना आवडला नाही. त्यांनी पीसीबी अध्यक्षांना उलट उत्तर दिलं. दोघांमध्ये चांगलाच वाद झाला आणि त्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली.

पीएसएलमध्ये आम्ही गुंतवणूक केली आहे. आमच्यामुळेच ही लीग सुरू असल्याचा दावा क्वेटा ग्लॅडिएटर्सचे मालक नदीम कादीर यांनी केला. राजा यांना हा दावा आवडला नाही.पीएसएल हे आमचं घर आहे, आम्ही सहा यशस्वी सिझनचं आयोजन केलं आहे, असे राजा यांनी सुनावले.

IND vs NZ: 89 वर्षांत कुणालाही जमलं नाही ते श्रेयसनं केलं, 'हा' रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

पीएसएलमध्ये प्रत्येत टीमला खेळाडूंच्या खरेदीसाठी 0.95 दशलक्ष डॉलर मिळाले आहेत. ही रक्कम 1.2 दशलक्ष डॉलर (9 कोटी) रूपये करण्यात यावी असा प्रस्ताव राजा यांनी ठेवला होता. त्या प्रस्तावावर हा सर्व वाद झाला. या वादानंतर आगामी सिझनमधील खेळाडूंसाठी असलेली एकूण रक्कम बदलण्यात येणार नाही, असे निश्चित झाले आहे. त्यामुळे आगामी सिझनमध्ये खेळाडूंना अधिक पैसा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

पीएसएलचा सातवा सिझन 15 जानेवारीनंतर सुरु होण्याची शक्यता आहे. त्या स्पर्धेसाठीचा ड्राफ्ट डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर निश्चित होणार आहे.

First published:

Tags: Cricket news, Pakistan, Pakistan Cricket Board