World Cup : 'मी एकटा घरी जाणार नाही', सर्फराजने सहकाऱ्यांना बजावलं!

ICC Cricket World Cup 2019 : Ind Vs Pak : भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकचा कर्णधार सर्फराजने आपल्या सहकाऱ्यांना खेळात सुधारणा करण्यास सांगितलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 08:57 PM IST

World Cup : 'मी एकटा घरी जाणार नाही', सर्फराजने सहकाऱ्यांना बजावलं!

मॅनचेस्टर, 19 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत पाकिस्तानला भारताविरुद्ध दारूण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पाकचा कर्णधार सर्फराज अहमदला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. दिग्गज क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच त्याला झापलं आहे. सर्फराजने भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर खेळात आणखी सुधारणा करण्याचं सहकाऱ्यांना सांगितलं आहे. पाकिस्तानची वर्ल्ड कपमधील कामगिरी निराशाजनक अशीच आहे. त्यांना पाचपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. तीन गुणांसह ते गुणतक्त्यात नवव्या क्रमांकावर आहेत.

पाकच्या पराभवानंतर सर्फराजला टीकेला सामोरं जावं लागत आहे. आता जर एक जरी सामना त्यांनी गमावला तर वर्ल्ड कपमधील त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे पाकिस्तानला जाताना मी एकटा घरी जाणार नाही असं सर्फराजने सांगितलं आहे. वर्ल्ड कपमध्ये पुढं जाता आलं नाही तर देशातील जनतेला आपण सर्वांनी तोंड द्यायचं आहे असं सर्फराजने म्हटलं आहे.

भारताने पाकिस्तानवर विजय मिळून वर्ल़्ड़ कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध अपराजित राहण्याचा इतिहास कायम राखला. या सामन्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधारावर चौफेर टीका केली जात आहे. पाकच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी याआधीच सर्फराजला धारेवर धरलं होतं. भारताविरुद्धचा पराभव पाकच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. सामन्यात पाकिस्तानकडून जिंकण्यासाठी काहीच प्रयत्न झाला नाही. सुरुवातीपासून सर्फराजने चुका केल्या असं म्हणत चाहत्यांनी अपशब्दांत टीका केली.

सर्फराजवर चाहत्यांनी राग काढल्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. सामन्यानंतर काही चाहत्यांनी सर्फराजला जाड्या म्हटलं आहे. त्यावेळी सर्फराज अहमदने चाहत्यांकडे पाहिलं मात्र, कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याशिवाय सर्फराजने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी का घेतली नाही. पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेला सल्ला मानला नाहीस असंही चाहत्यांनी सुनावलं आहे.


Loading...

पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेसुद्धा कठोर शब्दांत सर्फराजला फैलावर घेतलं होतं. सर्फराजला त्याने बिनडोक म्हटलं आहे. भारताना चॅम्पियन ट्रॉफीत जी चूक केली होती ती पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये केली. मला कळत नाही की सर्फराज एवढा मूर्ख कसा असू शकतो. तो कसं काय विसरला की आपण पाठलाग करण्यात तरबेज नाही.

भारताविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजने चाहत्यांच्या रागाची कर्णधार सर्फराज अहमदने इतकी धास्ती घेतली आहे की, मी एकटा पाकिस्तानला जाणार नाही. संपूर्ण देशातील लोकांसमोर आपण सर्वांनी जायचं असंच त्याने सहकारी खेळाडूंना बजावलं आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 336 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानने 40 षटकात 6 बाद 212 धावांपर्यंत मजल मारली. पावसामुळे सामना 35 षटकांनंतर थांबला होता. त्यानंतर 5 षटकांत त्यांच्यापुढे 135 धावांचे आव्हान दिलं होतं. हा सामना भारताने 86 धावांनी जिंकला.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 08:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...