मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup पूर्वी बाबर आझमनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, गेल आणि विराटला टाकलं मागं

T20 World Cup पूर्वी बाबर आझमनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, गेल आणि विराटला टाकलं मागं

पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) यानं टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) यानं टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) यानं टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 ऑक्टोबर : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) यानं टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 7 हजार रन करणारा बॅटर बनला आहे. पाकिस्तानातील नॅशनल टी20 कप स्पर्धेत 59 रनची खेळी करत त्यानं हा रेकॉर्ड केला आहे. बाबरनं यावेळी ख्रिस गेल (Chris Gayle) आणि विराट कोहलीला मागं टाकलं आहे. बाबरचा हा फॉर्म टीम इंडियासाठी काळजीचा विषय आहे. कारण, आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाची पहिली लढत पाकिस्तानशी 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

बाबरनं सेंट्रल पंजाबकडून खेळताना 49 बॉलमध्ये नाबाद 59 रन काढले. या खेळीत त्यानं 5 फोर आणि 2 सिक्स लगागवले. बाबरच्या अर्धशतकामुळे साऊदर्न पंजाबचा 7 विकेट्सनं पराभव झाला. बाबरनं 187 इनिंगमध्ये 7 हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी हा  रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर होता. त्यानं 192 इनिंगमध्ये 7 हजार रन केले होते. विराटनं 212 इनिंगमध्ये ही कामगिरी केली असून या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बाबर आझमनं त्याच्या एकूण टी20 कारकिर्दीमध्ये 196 मॅच खेळल्या असून त्यामधील 187 इनिंगमध्ये 6 शतक आणि 59 अर्धशतक झळकावली आहेत. 122 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीमध्ये 56 इनिंगमध्ये 47 च्या सरासरीनं 2204 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. बाबरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक झळकावलं आहे. तर विराट कोहलीला अजून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेलं नाही.

'फक्त 1 कप चहा, एसी-लाईट बंद', कंगाल PCB चा धडकी भरवणारा नियम!

टी20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 30 पेक्षा जास्त खेळाडूंनी 7 हजारांपेक्षा जास्त रन केले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 14276 रनसह नंबर वनवर आहे. पाच जणांनी 10 हजारपेक्षा जास्त रन केले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड, पाकिस्तानचा शोएब मलिक, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहलीचा समावेश आहे. पाकिस्तानच्या बाबर, शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज या तिघांनी हा टप्पा ओलांडला आहे. तर भारताकडून विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी 7 हजार रन केले आहेत.

First published:

Tags: Babar azam, Pakistan, Virat kohli