Home /News /sport /

बाबर आझमसाठी खेळाडू जीव देण्यासही तयार, पाकिस्तानच्या बॉलरचं मोठं वक्तव्य

बाबर आझमसाठी खेळाडू जीव देण्यासही तयार, पाकिस्तानच्या बॉलरचं मोठं वक्तव्य

पाकिस्तान क्रिकेट टीमची कामगिरी (Pakistan Cricket) गेल्या काही महिन्यांमध्ये उंचावली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे पाकिस्तान टीमचा कॅप्टन बाबर आझमची (Babar Azam) खेळाडूंमधील लोकप्रियता वाढली आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : पाकिस्तान क्रिकेट टीमची कामगिरी (Pakistan Cricket)  गेल्या काही महिन्यांमध्ये उंचावली आहे. त्यांनी गेल्या 9 पैकी 8 टी20 इंटरनॅशनल मॅच जिंकल्या आहेत. पाकिस्तानने वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाचा पराभव केला. टी20 वर्ल्ड कपमधील ग्रुप स्टेजच्या सर्व मॅच जिंकल्या. त्याचबरोबर बांगलादेश विरुद्ध 2 टेस्ट देखील जिंकल्या आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे पाकिस्तान टीमचा कॅप्टन बाबर आझमची (Babar Azam) खेळाडूंमधील लोकप्रियता वाढली आहे. पाकिस्तान टीमचा बॉलर शादाब खान (Shadab Khan) याने पाकिस्तानच्या या कामगिरीचे सर्व श्रेय बाबर आझमला दिले आहे. बाबरची प्रशंसा करत असताना त्याच्यासाठी खेळाडू जीव देण्यासही तयार असल्याचा दावा केला. 'जिओ टीव्ही' या पाकिस्तानच्या चॅनलशी बोलताना शादाबनं हा दावा केला. 'बाबरचे मैदानातील निर्णय पाहिल्यानंतर तो एक प्रभावशाली लीडर असल्याचे स्पष्ट होते. त्याच्या लीडरशीपमध्ये खास गोष्ट असून त्यामुळेच टीम एकत्र चांगली कामगिरी करत आहे. या प्रकारच्या लीडरसाठी आम्ही जीव देण्यासाठी देखील तयार आहोत. आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे.' असे शादाबने सांगितले. Ashes Series : WTC पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची मोठी उडी, भारत-पाकिस्तानला फटका PCB अध्यक्षांनीही केली प्रशंसा शादाब खानच्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी देखील बाबरची प्रशंसा केली होती. 'बाबर आझमच्या समर्थ आणि निर्भिड नेतृत्त्वामुळे पाकिस्तान क्रिकेट टीमनं गेल्या 2 महिन्यात यूएई आणि बांगलादेशमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याची लीडरशीप खूप महत्त्वाची आहे, हे मला विशेष सांगायचे आहे. तुम्ही कॅप्टनला मदत केली, त्याला पाठिंबा दिला तर तो टीमच्या चांगल्या आणि वाईट कामगिरीची जबाबदारी घेऊ शकतो.'  असे राजा यांनी स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या