मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'आमच्या बॉलरचं कागदावरचं वय 17-18, पण...', पाकिस्तानी खेळाडूचाच गौप्यस्फोट

'आमच्या बॉलरचं कागदावरचं वय 17-18, पण...', पाकिस्तानी खेळाडूचाच गौप्यस्फोट

पाकिस्तानचा (Pakistan) माजी फास्ट बॉलर मोहम्मद असिफनं (Mohammad Asif) त्याच्या टीमच्या बॉलर्सवर गंभीर आरोप केला आहे.माजी विकेट किपर-बॅट्समन कमरान अकमलशी (Kamran Akmal) यु ट्यूब चॅनलवर चर्चा करताना त्यानं आरोप केला आहे.

लाहोर, 2 जानेवारी :  पाकिस्तानचा (Pakistan) माजी फास्ट बॉलर मोहम्मद असिफनं (Mohammad Asif) त्याच्या टीमच्या बॉलर्सवर गंभीर आरोप केला आहे. “सध्याच्या पाकिस्तान टीममधील बॉलर्सचं वय हे त्यांच्या अधिकृत वयापेक्षा किती तरी जास्त आहे. ते मोठे स्पेल टाकू शकत नाहीत.’’ असा दावा आसिफनं केला आहे. पाकिस्तानचा माजी विकेट किपर-बॅट्समन कमरान अकमलशी (Kamran Akmal) यु ट्यूब चॅनलवर चर्चा करताना त्यानं हा आरोप केला.

‘आधीच्या पिढीसारखं पाकिस्तानचे बॉलर्स टेस्ट क्रिकेटमध्ये 20 विकेट्स का घेऊ शकत नाहीत?’ असा प्रश्न आसिफला विचारण्यात आला होता. त्यावर आसिफ म्हणाला, “ माझ्या मते पाकिस्तानच्या बॉलरनं एका टेस्टमध्ये 10 विकेट्स घेऊन आता पाच-सहा वर्ष झाली. न्यूझीलंडमधील पिच पाहून आमच्या उत्साह संचारत असे. मी कधीही पाच विकेट्स घेतल्याशिवाय बॉलिंग थांबवली नाही.’’

आसिफनं सांगितलं कारण

आसिफ पुढे म्हणाला, “ या मुलांना ज्ञान नाही. बॅट्समनला फ्रंट फुटवर कसं खेळवायचं तसंच एकही रन काढू न देता स्टंपवर बॉल कसा टाकाला पाहिजे हे माहिती नाही. ते स्टंपवर बॉल टाकण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा तो लेग साईडला जातो. त्यांच्याकडं नियंत्रण नाही.

आसिफ पुढे म्हणाला, “ त्यांचं वय कागदोपत्री 17-18 असलं तरी वास्तविक ते 27-28 वर्षांचे असतात. त्यांच्यामध्ये 20-25 ओव्हर्स बॉलिंग करण्याची क्षमता नाही. ते शरिराचा लवचिक वापर करु शकत नाहीत. 5-6 ओव्हर बॉलिंग टाकली की ते थकतात.’’

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शाहिन आफ्रिदी, नसीम शाह आणि मोहम्मद अब्बास हे तीन पाकिस्तानचे फास्ट बॉलर खेळले होते. पाकिस्तानचा त्या टेस्टमध्ये टेस्टमध्ये 101 रन्सनं मोठा पराभव झाला. आता या मालिकेतील दुसरी आणि शेवटची टेस्ट 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket