मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवर हल्ला! फॅन्स म्हणून आले होते हल्लेखोर

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवर हल्ला! फॅन्स म्हणून आले होते हल्लेखोर

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं (Pakistan Cricketer) त्याच्यावर हल्ला झाल्याची तक्रार केली आहे. हे हल्लेखोर फॅन म्हणून सेल्फी घेण्यासाठी आले होते, तेव्हा ही घटना घडल्याचा त्याचा दावा आहे.

  • Published by:  News18 Desk

कराची, 11 जुलै: पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलनं (Umar Akmal) त्यावर हल्ला झाल्याची तक्रार केली आहे. उमरच्या कराचीमधील घराबाहेर ही घटना घडली आहे. या प्रकरणात उमरनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यामध्ये एक ब्रिटनचा नागरिक आहे. उमर अकमल हा पाकिस्तानमधील वादग्रस्त क्रिकेटपटू आहे. त्याच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या प्रकरणात त्याच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) 18 महिन्यांची बंदी घातली आहे. ही बंदी पुढील महिन्यात संपणार आहे.

उमर अकमलनं दिलेल्या माहितीनुसार हे दोघे जण फॅन असल्याचं सांगत त्याला भेटले. उमरसोबत सेल्फी घेतला त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. उमरने पोलिसांना या प्रकरणात पुरावा म्हणून व्हिडीओ देखील दिला आहे. दरम्यान दुसऱ्या गटानं उमरवरच हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

उमर अकमलनं मागितली होती माफी

उमर अकमलनं त्याच्या कृतीबद्दल परिवार, क्रिकेट फॅन्स आणि पाकिस्तानच्या नागरिकांची माफी मागितली होती. त्याच्या माफीचा व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आहे. यामध्ये त्यानं मागच्यावर्षी आपल्या हातून एक चूक घडली, याचा परिणाम क्रिकेट करियरवर झाला. त्याचबरोबर त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानची बदनामी झाली, अशी कबुली दिली आहे.

आथिया शेट्टीच्या भावासोबत दिसला केएल राहुल, युझर्सनी दिली भन्नाट प्रतिक्रिया

उमर अकमलनं या व्हिडीओत सांगितले की, 'आजपासून 17 महिन्यांपूर्वी माझ्याकडून एक चूक झाली. काही जणांनी माझ्याशी संपर्क साधला होता. मी त्याची माहिती पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली नाही. त्याचा माझ्या क्रिकेट करियरला मोठा फटका बसला आहे. मला बंदी सहन करावी लागली. मी क्रिकेटपटू असूनही मला क्रिकेट खेळता आलं नाही. हा माझ्यासाठी खूप खडतर काळ होता. या काळात मी खूप काही शिकलो आहे.

First published:

Tags: Cricket, Crime, Pakistan, Pakistan Cricket Board