मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'माझ्यामुळे देशाची बदनामी झाली', पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं मागितली माफी! पाहा VIDEO

'माझ्यामुळे देशाची बदनामी झाली', पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं मागितली माफी! पाहा VIDEO

पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलनं (Umar Akmal) त्याच्या कृतीबद्दल परिवार, क्रिकेट फॅन्स आणि पाकिस्तानच्या नागरिकांची माफी मागितली आहे. त्याच्या माफीचा व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 जुलै: पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलनं (Umar Akmal) त्याच्या कृतीबद्दल परिवार, क्रिकेट फॅन्स आणि पाकिस्तानच्या नागरिकांची माफी मागितली आहे. त्याच्या माफीचा व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला आहे. यामध्ये त्यानं मागच्यावर्षी आपल्या हातून एक चूक घडली, याचा परिणाम क्रिकेट करियरवर झाला. त्याचबरोबर त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानची बदनामी झाली, अशी कबुली दिली आहे.उमर अकमलवर भ्रष्टाचार विरोधी दोन वेगवेगळ्या प्रकरणात तीन वर्ष क्रिकेट खेळण्याची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हा कालावधी कमी करत 18 महिने करण्यात आला. उमरवरील बंदी पुढच्या महिन्यात समाप्त होणार आहे.

उमर अकमलनं या व्हिडीओत सांगितले की, 'आजपासून 17 महिन्यांपूर्वी माझ्याकडून एक चूक झाली. काही जणांनी माझ्याशी संपर्क साधला होता. मी त्याची माहिती पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली नाही. त्याचा माझ्या क्रिकेट करियरला मोठा फटका बसला आहे. मला बंदी सहन करावी लागली. मी क्रिकेटपटू असूनही मला क्रिकेट खेळता आलं नाही. हा माझ्यासाठी खूप खडतर काळ होता. या काळात मी खूप काही शिकलो आहे.

View this post on Instagram

A post shared by Khel Shel (@khelshel)

'माझ्यामुळे पाकिस्तानची बदनामी'

उमर अकमल पुढे म्हणाला की, "मी आज सर्व लोकांसमोर माझी चूक मान्य करतो. या चुकीमुळे पाकिस्तान क्रिकेटची बदनामी झाली. माझा परिवार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तसेच जगभरातील क्रिकेट फॅन्सची मी माफी मागतो. तुम्ही सर्वांनी या प्रकारच्या गोष्टींपासून दूर रहावं असं आवाहन मी करत आहे.'

कॅच पकडण्यासाठी वडिलांनी कडेवरच्या मुलीला सोडलं, पुढे काय झालं...पाहा VIDEO

उमर अकमलची कारकिर्द नेहमी वादग्रस्त ठरली आहे. पहिल्या टेस्टमध्ये शतक करणाऱ्या अकमलनं कायमच शिस्तभंग केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी संचालक नजम सेठी यांनी तर त्याला एखाद्या मानसिक रोगावर इलाज करणाऱ्या डॉक्टरकडून उपचार करण्याचा सल्ला दिला होता.

First published:

Tags: Cricket news, Pakistan Cricket Board, Video viral