World Cup: पाकच्या विजयानंतर मैदानात चाहत्यांचा राडा; खेळाडूंनाही सोडलं नाही! Pak vs Afg | Cricket | World Cup

World Cup: पाकच्या विजयानंतर मैदानात चाहत्यांचा राडा; खेळाडूंनाही सोडलं नाही!  Pak vs Afg | Cricket | World Cup

दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये मैदानातच जुंपली.

  • Share this:

लीड्स, 30 जून: ICC Cricket World Cupमध्ये अत्यंत अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानचा (Afghanistan) पराभव केला. या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये मैदानातच जुंपली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्ताने विजय मिळवला खरा, पण या विजयासाठी अफगाणिस्ताने त्यांना कडवी लढत दिली. प्रत्येक चेंडूसह सामन्याचे चित्र कधी पाकिस्तान तर कधी अफगाणिस्तानच्या बाजूने झुकत होते. अशातच पाकिस्तानने विजय मिळवला आणि स्टेडियममध्ये चाहत्यांमध्ये राडा सुरु झाला.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या समर्थकांनी प्रथम एकमेकांना बाटल्या फेकून मारल्या त्यानंतर हातापायी देखील झाली. विशेष म्हणजे मैदानात हा प्रकार सुरु असताना सुरक्षा रक्षकांना यासंदर्भात काहीच माहिती नव्हते. इतक नव्हे तर एका बाजूला स्टेडियममध्ये हणामारी सुरु होती तर काही चाहते थेट मैदानात उतरले. अफगाणिस्तानचे काही चाहते क्रिकेटपटूंना भेटण्यासाठी मैदानात उतरले होते. अशातच एका सुरक्षा रक्षकाने रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या चाहत्याने चक्क क्रिकेटपटूलाच मैदानावर पाडले. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानने विजयासाठी प्रयत्न केला. पण त्याना यश आले नाही. यामुळे संघातील अनेक खेळाडू नाराज होते.

मैदानातच लावली आग

पाकिस्तान आणि आफगाणिस्तान यांच्यातील राडा इतका टोकाला गेला की, चाहत्यांनी फक्त एकमेकांना मारहाण केली नाही. तर पाकिस्तानच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये अशी काही तरी गोष्ट आणली होती की त्यातून धुर येत होता. त्याआधी सामन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी घोषणाबाजी केली होती. अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानचे काही चाहते तिकीट नसताना मैदानात घुसले होते आणि त्यांनीच मारहाण आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर देखील पाकिस्तानच्या काही पत्रकारांनी असा आरोप केला की अन्य प्रेक्षकांसमोर अफगाणी चाहत्यांनी शिव्या आणि असभ्य वर्तन केले.

पाकिस्तानी पत्रकाराला केली मारहाण

दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये सुरु असलेल्या या राड्यात एका पाकिस्तानी पत्रकाराला देखील मारहाण करण्यात आली. पाकिस्तानी पत्रकार जखरुफ खान यांनी ट्वीट करुन सांगितले की, अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियमच्या आत आणि बाहेर पाकिस्तानी चाहत्यांना शिव्या देत होते. त्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. डॉन टिव्ही पत्रकार मखदूर अबू बकर बिलाल यांना देखील मारहाण केली. सामना सुरु असताना देखील स्टेडिअममध्ये तणावाचे वातावरण होते. दोन्ही चाहत्यांमध्ये झालेल्या वादात सुरक्षा रक्षकांनी अनेकांना बाहेर देखील काढल्याचे पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांनी सांगितले.

बलुचिस्तानला न्याय द्या...

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरु असताना राजकीय पोस्टबाजी देखील दिसली. एका चाहत्याने बलुचिस्तानला न्याय पाहिजे आणि पाकिस्तानातून गायब होणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी मदत करा, अशी पोस्टर मैदानात आणले होते.

चालकानं हातात छत्री धरून चालवली KDMCची गळकी बस, VIDEO व्हायरल

First published: June 30, 2019, 8:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading