मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PAK vs WI : पाकिस्तानची फिल्डिंग काही सुधारत नाही, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

PAK vs WI : पाकिस्तानची फिल्डिंग काही सुधारत नाही, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

पाकिस्ताननं  गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला. या मॅचनंतर (Pakistan vs West Indies) वेस्ट इंडिजच्या पराभवापेक्षा पाकिस्तानच्या खराब फिल्डिंगची चर्चा जास्त झाली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 डिसेंबर : बाबर आझमच्या (Babar Azam) पाकिस्तान टीमने वेस्ट इंडिजचा (Pakistan vs West Indies) टी20 मालिकेत 3-0 ने पराभव केला. या दमदार कामगिरीनंतरही मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमनं पुन्हा एकदा खराब फिल्डिंग केली आहे. कराचीमध्ये गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं वेस्ट इंडिजचा पराभव केला.  या मॅचनंतर वेस्ट इंडिजच्या पराभवापेक्षा पाकिस्तानच्या खराब फिल्डिंगची चर्चा जास्त झाली.

मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) आणि इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) या जोडीनं एक सोपा कॅच सोडला. त्यांच्या या खराब फिल्डिंगमुळे सोशल मीडियावर पाकिस्तान टीमवर जोरदार टीका होत आहे. कराचीतील मॅचमध्ये सोडलेला कॅच पाहून क्रिकेट फॅन्सना  शोएब मलिक (Shoaib Malik) आणि सईद अजमल (Saeed Ajmal) यांनी सोडलेल्या प्रसिद्ध कॅचची आठवण झाली. मलिक-अजमल जोडीनं तो कॅच याच पद्धतीनं सोडला होता. त्यानंतरही सोशल मीडियावर पाकिस्तान टीम चांगलीच ट्रोल झाली होती.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचमध्येही याच पद्धतीनं कॅच सोडल्यानं पाकिस्तानची टीम ट्रोल होत आहे. वेस्ट इंडिजच्या इनिंगमधील 8 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. मोहम्मद नवाज तेव्हा बॉलिंग करत होता. शामराह ब्रुक्सने मारलेला बॉल पकडण्यासाठी हसनैन आणि इफ्तिकार या दोघांनीही पकडण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यांना तो कॅच पकडला आला नाही. विशेष म्हणजे मलिक अजमल जोडीनं याच पद्धतीनं वेस्ट इंडिज विरुद्धच असाच कॅच यापूर्वी सोडला होता.

वेस्ट इंडिजने गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये 3 आऊट 207 रन केले. पाकिस्ताननं 208 रनचं आव्हान 7 विकेट्स राखून पूर्ण केले. मोहम्मद रिझवानने 45 बॉलमध्ये 87 तर बाबर आझमने 53 बॉलमध्ये 79 रन काढले. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 158 रनची भागिदारी करत विजयाचा पाया रचला.

Virat vs BCCI वादावर हर्षा भोगलेंची प्रतिक्रिया, राहुल द्रविडचं नाव घेत म्हणाला...

First published:

Tags: Cricket, Pakistan, Video Viral On Social Media, West indies