मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /PAK vs SA: पाकिस्तानला मॅच जिंकून देणाऱ्या खेळाडूवरच शोएब अख्तरची टीका!

PAK vs SA: पाकिस्तानला मॅच जिंकून देणाऱ्या खेळाडूवरच शोएब अख्तरची टीका!

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar)  पाकिस्तानला कराची टेस्ट जिंकून देणाऱ्या खेळाडूवरच टीका केली आहे.

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) पाकिस्तानला कराची टेस्ट जिंकून देणाऱ्या खेळाडूवरच टीका केली आहे.

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) पाकिस्तानला कराची टेस्ट जिंकून देणाऱ्या खेळाडूवरच टीका केली आहे.

कराची, 30 जानेवारी : पाकिस्ताननं कराची टेस्टमध्ये जबरदस्त खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनं पराभव केला. फवाद आलम (Fawad Alam) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 109 रन्सची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेची दुसरी इनिंग 245 रनवर संपुष्टात आली. त्यानंतर विजयसाठी आवश्यक असलेले 88 रन पाकिस्ताननं 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) या विजयानंतरही समाधान झालेलं नाही.

काय म्हणाला शोएब?

शोएबनं त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ (VIDEO) पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यानं पाकिस्तानच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम अगदीच सामान्य असल्याचं सिद्ध झालं, असं शोएब म्हणाला. त्याचबरोबर त्यानं या मॅचचा हिरो फवाद आलम याच्यावर देखील टीका केली आहे.

“फवाद आलमचं बॅटींग निस्तेज आहे. तो बॅटिंग करताना अजिबात चांगला वाटत नाही. त्याचा कोणताही दर्जा नाही,’’ अशी बोचरी टीका शोएबनं केली आहे. त्याचवेळी त्यानं फवादच्या मानसिक कणखरतेची प्रशंसा केली आहे. फवादवर अन्याय झाला आहे, त्याने 8 टेस्टमध्येच 3 शतक ठोकत स्वत:ला सिद्ध केलं आहे, असंही शोएबनं स्पष्ट केलं.

(वाचा - PAK vs SA: पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचा फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या नेमकं कारण)

“पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दोन्ही इनिंगमध्ये खराब खेळ केला. त्यानंतर अझर अली आणि कोणत्याही तंत्राशिवाय खेळणारा फवाद आलम यांनी पाकिस्ताला मॅचमध्ये परत आणलं. तिसऱ्या इनिंगमध्ये पिचची अवस्था खराब झाली होती. पाकिस्तानला देखील तेच हवं होतं.’’, असं शोएबनं सांगितलं.

PCB ला विचारला प्रश्न

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानच्या नौमन अलीनं (Nauman Ali) पाच विकेट्स घेतल्या. वयाच्या 34 व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला आहे. नौमनला इतक्या उशीरा संधी का दिली? असा प्रश्न अख्तरनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) विचारला आहे.

“पाकिस्तानच्या पहिल्या चार बॅट्समन्सनी चांगले रन केले पाहिजेत. फवाद आलम प्रत्येक वेळी टीमला वाचवू शकत नाही,’’ असंही शोएबनं सुनावलं आहे.

First published:

Tags: Cricket