मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PAK vs SA: फेक फिल्डिंगमुळे फखर जमान आऊट! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला शिक्षा, पाहा VIDEO

PAK vs SA: फेक फिल्डिंगमुळे फखर जमान आऊट! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला शिक्षा, पाहा VIDEO

फखर जमानची दुसरी डबल सेंच्युरी होणार असंच सर्वांना वाटत होतं. त्यावेळी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून खेळणाऱ्या क्विंटन डि कॉक (Quinton De Kock) याच्या फेक फिल्डिंगमुळे फखर रन आऊट झाला.

  • Published by:  News18 Desk

जोहान्सबर्ग, 5 एप्रिल : पाकिस्तानचा ओपनर फखर जमान (Fakhar Zaman) याने 155 बॉलमध्ये 193 रन रन काढले. त्याच्या या मोठ्या खेळीनंतरही दुसऱ्या वन-डे मध्ये पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Pakistan vs South Africa) 17 रननं पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटींग करताना 6 आऊट 341 रन केले. फखरच्या शतकानंतरही पाकिस्तानला 9 आऊट 324 पर्यंत मजल मारता आली.

फेक फिल्डिंगचा बळी

फखर जमानची दुसरी डबल सेंच्युरी होणार असंच सर्वांना वाटत होतं. त्यावेळी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून खेळणाऱ्या क्विंटन डि कॉक (Quinton De Kock) याच्या फेक फिल्डिंगमुळे फखर रन आऊट झाला. क्विंटन डी कॉकनं नॉन स्ट्राईकरकडं थ्रो करत असल्याचा इशारा केला. तो पाहून फखर रन काढताना स्लो झाला. त्याचवेळी लाँग ऑनच्या फिल्डरनं सरळ थ्रो केला जो स्टंपला लागला. डि कॉकच्या या फेक फिल्डिंगमुळे त्याला आणि दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बवुमा याला दंड आकारण्यात आला आहे.

फखरला या पद्धतीनं आऊट केल्याबद्दल  आयसीसीनं (ICC) दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही खेळाडूंवर दंडात्मक कारवाई केली आहे. आयसीसीनं क्विंटन डि कॉकची 75 टक्के तर टेंबा बवुमाची 20 टक्के मॅच फिस कापण्याचा निर्णय घेतला आहे.

क्विंटन डी कॉकच्या या फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानच्या फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. या रन आऊटचा व्हिडीओ आता व्हायरल (Viral) झाला आहे. यामध्ये डि कॉक नॉन स्ट्रायकरच्या दिशेला बॉल थ्रो करण्याची सूचना करत आहे. त्याच दिशेनं हॅरीस रौफ पळत होता. डि कॉकनं हा इशारा करताच फखर थोडा स्लो झाला. तो पाठीमागे वळून नॉन स्ट्रायकरच्या दिशेनं पाहात होता. त्याचवेळी तो पळत असलेल्या दिशेनं थ्रो आला आणि रन आऊट झाला.

आयसीसीचा नियम काय?

आयसीसीच्या 41.5.1 च्या नियमानुसार बॅट्समनचं लक्ष विचलित करणे तसेच त्याला फसवून आऊट करणे अवैध आहे. या प्रकरणात मैदानातील अंपायरला वाटले तर त्याला दोषी टीमवर 5 रनची दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र या मॅचमध्ये अंपायरने तशी कारवाई केली नाही. मॅच संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंवर दंडात्मक कारवाई केली.

( वाचा : फखर जमानची 193 धावांची उत्कृष्ट खेळी, मात्र तरीही पाकिस्तानला अपयश )

अंपायरनी मैदानातच शिक्षा करण्याचा निर्णय घेतला असता तर पाकिस्तानला 5 रन अतिरिक्त मिळाले असते. त्याचबरोबर कदाचित फखरची डबल सेंच्युरी देखील झाली असती. पण, तसं काहीही झालं नाही. त्यामुळे या प्रकरणात पक्षपात झाल्याचा आरोप पाकिस्तानचे फॅन्स करत आहेत.

First published:

Tags: Cricket news, Icc, Pakistan, South africa