मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'PCB अध्यक्ष असतो तर...', बाबर आझमच्या निर्णयावर शोएब अख्तर संतापला! पाहा VIDEO

'PCB अध्यक्ष असतो तर...', बाबर आझमच्या निर्णयावर शोएब अख्तर संतापला! पाहा VIDEO

इंग्लंडनं दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये पाकिस्तानचा 45 रननं (ENG vs PAK) पराभव केला. या मॅचमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने घेतलेल्या निर्णयावर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) चांगलाच संतापला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 जुलै: इंग्लंडनं दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये पाकिस्तानचा 45 रननं (ENG vs PAK) पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंडनं टी 20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंड पहिल्यांदा बॅटींग करत पाकिस्तानला 201 रनचं आव्हान दिले होते. बाबर आझमच्या (Babar Azam) पाकिस्तान टीमला हे आव्हान पेलवलं नाही.  पाकिस्तानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 155 रन काढले. या सामन्यात बाबर आझमच्या एका निर्णयावर पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानं जोरदार टीका केली आहे.

शोएब अख्तरनं त्याच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करत आझमची शाळा घेतली आहे. अख्तर म्हणाला, 'टॉस जिंकल्यानंतर पाकिस्ताननं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतला? हे मला समजले नाही. इंग्लंडमधील सर्वात गरम दिवस होता. ऊन पडल्यानंतर, इतक्या सपाट विकेटवर, पहिल्या मॅचमध्ये  232 रन केल्यानंतरही बॉलिंग का घेतली?  बटलर खेळणार आहे आणि तो ओपनिंग करणार हे माहिती असूनही पाकिस्ताननं हा निर्णय का घेतला हे मला समजलं नाही.

पाकिस्तानकडं या फ्लॅट पिचवर मॅच जिंकून मालिका खिशात घालण्याची उत्तम संधी होती. मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) अध्यक्ष असतो तर पहिल्यांदा बॉलिंग घेतल्याबद्दल टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टनला तातडीनं बडतर्फ केलं असतं,' असा दावा अख्तरनं केला.

सर्वात जास्त रन केल्यानंतरही धवनचं टेन्शन वाढलं, टीममधील जागा अनिश्चित

बटलरचं आक्रमक अर्धशतक

इंग्लंडकडून कॅप्टन जोस बटलरनं सर्वात जास्त 59 रन केले. मोईन अली (36) आणि लियम लिविंगस्टन (38) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्तानसमोर विजयासाठी 201 रनचं लक्ष्य ठेवलं. पाकिस्तानला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची टीम निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 155 रनच करू शकली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 20 जुलै रोजी होणार आहे.

First published:

Tags: Cricket news, England, Pakistan Cricket Board