Home /News /sport /

पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद, शोएब अख्तरच्या टीकेनंतर बाबर आझमचा पलटवार

पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद, शोएब अख्तरच्या टीकेनंतर बाबर आझमचा पलटवार

इंग्लंड विरुद्धची वन-डे मालिका 0-3 ने गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. पाकिस्तानच्या खराब कामगिरीवर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) टीका केली आहे. त्याला बाबर आझमनं (Babar Azama) उत्तर दिलं आहे.

    लंडन, 15 जुलै: इंग्लंड विरुद्धची वन-डे मालिका 0-3 ने गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी या टीमवर टीका केली आहे. माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यामध्ये आघाडीवर आहे. अख्तरनं या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानच्या टीमवर टीका केली. या टीकेला पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने उत्तर दिलं आहे. शोएब अख्तरनं या पराभवानंतर एक ट्विट करत पाकिस्तानच्या टीमवर टीका केली होती. ‘पाकिस्तानचा इंग्लंड विरुद्ध 3-0 असा लाजीरवाणा पराभव. आपण दर उन्हाळ्यात इंग्लंडध्ये जातो आणि निकाल तोच लागतो. पाकिस्तानच्या सध्याच्या टीममध्ये एकही मोठा स्टार नाही. या टीमचे फॅन आणखी कमी होणार आहेत.’ असं अख्तरनं म्हंटलं आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं पत्रकारांशी बोलताना या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘प्रत्येक खेळाडू 100 टक्के योगदान देत आहे. पण, तो तसा विचार करत नाही. माझ्या मते हे त्यालाच (शोएब अख्तर) विचारलं पाहिजे की स्टार कोण आहे आणि कोण नाही? मला या विषयावर आणखी वाद किंवा प्रतिक्रिया द्यायची नाही.’ असं उत्तर बाबर आझमनं दिलं आहे. बाबर आझमचं शतक व्यर्थ इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वन-डेमध्ये बाबर आझमनं 158 रनची खेळी केली. यामध्ये 14 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. कोणत्याही पाकिस्तानी कर्णधाराचा वनडे क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी शोएब मलिकच्या (Shoaib Malik) नावावर हा विक्रम होता. 2008 साली मलिकने भारताविरुद्ध नाबाद 125 रन केले होते. 19000 रन करणारा मुंबईचा दिग्गज झाला ‘या’ टीमचा कोच, 5 महिन्यांपूर्वी सोडले होते पद बाबरच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडला 332 रनचं आव्हान दिलं होतं. जेम्स विन्सीचं (James Vince) शतक आणि लुईस ग्रेगरीचं अर्धशतक याच्या जोरावर इंग्लंडनं पाकिस्तानचा 3 विकेट्सनं पराभव केला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Babar azam, Cricket news, Pakistan, Shoaib akhtar

    पुढील बातम्या