मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जगभरातील फजितीनंतर पाकिस्तानचा अखेरचा उपाय, लाहोर टेस्टपूर्वी घेतला मोठा निर्णय

जगभरातील फजितीनंतर पाकिस्तानचा अखेरचा उपाय, लाहोर टेस्टपूर्वी घेतला मोठा निर्णय

पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात सध्या टेस्ट सीरिज होत आहे. या सीरिजमधील दोन टेस्ट झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) जोरदार टीका होत आहे

    मुंबई, 17 मार्च :  पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात सध्या टेस्ट सीरिज होत आहे. या सीरिजमधील दोन टेस्ट झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) जोरदार टीका होत आहे. रावळपिंडी आणि कराचीमधील टेस्टसाठी पीसीबीनं बनवलेल्या पिचवर जगभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियाची टीम तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आली आहे. या ऐतिहासिक दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केलेल्या तयारीमुळे पीसीबीचं जगभर हसं झालं आहे. या सीरिजमधील तिसरी आणि शेवटची टेस्ट 21 मार्चपासून लाहोरमध्ये होत आहे.  आता लाहोर टेस्टमध्ये आणखी फजिती होऊ नये यासाठी पीसीबीनं आयसीसी अकादमीचे माजी मुख्य क्युरेटर टोबी लम्सडेन यांना साकडं घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पीसीबीच्या विनंतीनंतर लम्सडेन त्यासाठी लाहोरमध्ये दाखल झाले आहेत. ते शेवटच्या टेस्टचे पिच तयार करण्यासाठी स्थानिक क्युरेटर्सना मदत करणार आहेत. लम्बसडेन यांनी यापूर्वी मेलबर्नमधील पिच (MCG) तयार केले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमिझ राजा यांनी पाकिस्तानमधील पिच चांगले करण्याचा मुद्दा गांभिर्यानं घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात लम्सडेन यांच्याशी दीर्घ कालावधीसाठी करार करण्याचा विचार पीसीबी करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 'ती' PSL ची क्षमताच नाही! माजी क्रिकेटपटूनं दिलं PCB अध्यक्षांना रोखठोक उत्तर पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया  यांच्यातील सीरिजमधील 2 टेस्टमध्ये 2300 पेक्षा जास्त रन निघाले आहेत. रावळपिंडी टेस्टमध्ये 14 विकेट्स गेल्या होत्या. तर कराचीमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये 48 विकेट्स पडल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket news, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या