• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • इंग्लंड दौऱ्यावर जाणारा टीम इंडियाचा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह, BCCI नं दिली पहिली प्रतिक्रिया

इंग्लंड दौऱ्यावर जाणारा टीम इंडियाचा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह, BCCI नं दिली पहिली प्रतिक्रिया

इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समितीनं टीमची घोषणा करताच दुसऱ्याच दिवशी या टीममधील प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याचा रिपोर्ट करोना पॉझिटीव्ह आला. या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे: वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. सुमारे चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी 20 सदस्यीय भारतीय टीम आणि 4  स्टँडबाय खेळाडूंची घोषणा निवड समितीनं केली आहे. निवड समितीनं टीमची घोषणा करताच दुसऱ्याच दिवशी या टीममधील प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याचा रिपोर्ट करोना पॉझिटीव्ह आला. या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्ध कृष्णा आयपीएल स्पर्धेच्या बायो-बबलमधून बाहेर पडला तेंव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह होता. स्पर्धा स्थगित झाल्यानं तो बंगळुरुला परतला. त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.कृष्णा हा गेल्या सहा दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेला केकेआरचा चौथा खेळाडू आहे. यापूर्वी सोमवारी वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. त्यानंतर केकेआरचा बॅट्समन टीम सिफर्ट (Tim Seifert) याला कोरोनाची लागण झाली. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कृष्णा सध्या त्याच्या बंगळुरुतील घरात आयसोलेशनमध्ये आहे. सर्व भारतीय खेळाडूंनी दोनवेळा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर बायो-बबल सोडले. कृष्णाला बंगळुरुतील घरी पोहचल्यानंतर कोरोनाची लागण झाली. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी असलेल्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कृष्णा कोरोनामधून बरा होईल, अशी आशा बीसीसीआयनं व्यक्तं केली आहे." भारतीय खेळाडूंना 25 मे रोजी या बायो-बबलमध्ये प्रवेश करायचा आहे. वीरेंद्र सेहवागनं शेअर केलं PK चं पोस्टर, खास शैलीत केलं आवाहन PHOTO कृष्णानं भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील वन-डे मालिकेच्या दरम्यान टीम इंडियात पदार्पण केलं. तीन वन-डे मॅचच्या त्या मालिकेत त्यानं सहा विकेट्स घेतल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याची इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये स्टँडबाय म्हणून निवड झाली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: