मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /On This Day : IPL मध्ये Gayle Storm, टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड!

On This Day : IPL मध्ये Gayle Storm, टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड!

ख्रिस गेलच्या वादळात (Gayle Storm) पुणे वॉरियर्सची संपूर्ण टीम उद्धवस्त झाली. गेलनं या मॅचमध्ये फक्त 66 बॉलमघ्ये 175 रन केले. ही टी 20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

ख्रिस गेलच्या वादळात (Gayle Storm) पुणे वॉरियर्सची संपूर्ण टीम उद्धवस्त झाली. गेलनं या मॅचमध्ये फक्त 66 बॉलमघ्ये 175 रन केले. ही टी 20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

ख्रिस गेलच्या वादळात (Gayle Storm) पुणे वॉरियर्सची संपूर्ण टीम उद्धवस्त झाली. गेलनं या मॅचमध्ये फक्त 66 बॉलमघ्ये 175 रन केले. ही टी 20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

मुंबई, 23 एप्रिल: क्रिकेट फॅन्सनी आजवर ज्याच्या कधी विचारही केला नव्हता ती गोष्ट आजच्या दिवशी (On This Day) 2013 साली बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमवर घडली. या मैदानात आलेल्या ख्रिस गेलच्या वादळात (Gayle Storm) पुणे वॉरियर्सची संपूर्ण टीम उद्धवस्त झाली. गेलनं या मॅचमध्ये फक्त 66 बॉलमघ्ये 175 रन केले. टी 20 क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. गेलनं 102 मिनिटाच्या या खेळीत 13 फोर आणि 17 सिक्स लगावले होते. त्यानं फक्त 30 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. हे सर्व टी20 क्रिकेटमधील रेकॉर्ड्स आहेत.

गेलचा कहर

पुणे वॉरियर्सचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) याने टॉस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) पहिल्यांदा बॅटींगचं निमंत्रण दिलं. पुणे वॉरियर्सच्या टीमच्या बाजूनं घडलेली ती एकमेव गोष्ट होती. ख्रिस गेलनं (Chris Gayle) दुसऱ्याच ओव्हरमध्ये 21 रन काढले. त्यानंतरही  पहिल्या 4 ओव्हरमध्ये आरसीबीचे 33 रन झाले होते. मिचेल मार्शनं टाकलेल्या 5 व्या ओव्हरमध्ये गेलनं 4 सिक्स लगावले. त्यानं अर्धशतक फक्त 17 बॉलमध्येच पूर्ण केलं.

सातव्या ओव्हरमध्ये गेलनं 2 सिक्स आणि 2 फोरची बरसात केली. त्यानंतर कॅप्टन आरोन फिंचनं 8 वी ओव्हर टाकण्याचं धाडस केलं. गेलनं फिंचच्या एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावले.  या फटकेबाजीमुळे गेल फक्त 27 बॉलमध्ये 95 वर पोहचला. गेलनं 9 व्या ओव्हरमध्ये अशोक डिंडाला सिक्स मारत गेलनं टी 20 क्रिकेटमधील सर्वात जलद शतक पूर्ण केलं. गेलनं शतक झळकावण्यासाठी फक्त 30 बॉल घेतले.

आरसीबीचा विशाल स्कोअर

ख्रिस गेलनं तिलकरत्ने दिलशानसोबत पहिल्या विकेटसाठी 167 रनची भागिदारी केली. यामध्ये दिलशानचा वाटा फक्त 33 रनचा होता. दिलशान आऊट झाल्यानंतरही गेलचा कहर सुरुच होता. तो 175 रन काढून अखेर नाबाद परतला. त्याच्या या विक्रमी खेळीमुळे आरसीबीनं पुणे वॉरियर्ससमोर विजयासाठी 264 रनचं टार्गेट ठेवलं. आरसीबीनं 20 ओव्हरमध्ये 2 आऊट 263 रन काढले. हा टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील एक विशाल स्कोअर आहे.

On This Day: सचिन तेंडुलकरच्या Desert Storm चा ऑस्ट्रेलियाला तडाखा!

पुणे वॉरियर्सच्या टीमला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 133 रनच करता आले. आरसीबीनं ती मॅच 130 रननं जिंकली. गेलनं त्या मॅचमध्ये बॉलिंगमध्येही कमाल करत 2 विकेट्स घेतल्या. गेलच्या वादळी खेळाची आठवण आजही क्रिकेट फॅन्सच्या मनात ताजी आहे.

First published:

Tags: Chris gayle, Cricket, On this Day